हिमा दास आता पोलिस अधिकारी

हिमा दास आता पोलिस अधिकारी

भारताची स्टार धावपटू हिमा दास आता आसाम राज्याची डेप्युटी सुपरिंटेंडंट ऑफ पोलिस झाली आहे. पोलिस निरीक्षक होणे हे आपले बालपणापासूनचे स्वप्न असल्याचे तिने यावेळी सांगितले. आसामचे मुख्यमंत्री सर्बनंद सोनोवाल यांनी स्वहस्ते तिचे नेमणुकपत्र तिला बहाल केले. यावेळी माजी केंद्रीय क्रिडा मंत्री देखील उपस्थित होते.

हे ही वाचा:

दख्खनेत कसा आला हिंदूद्वेष्टा औरंगजेब

पोलिस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला . यावेळी सरकारमधील काही उच्चपदस्थ अधिकारी देखील आले होते. उपस्थितांशी संवाद साधताना हिमा दास हीने पोलिस अधिकारी होणे हे आपले बालपणापासूनचे स्वप्न असल्याचे सांगितले.

“उपस्थित सर्वांनाच माहित आहे, आणि मी देखील काही वेगळे सांगणार नाही. मला बालपणापासूनच पोलिस अधिकारी होण्याची इच्छा होती, आणि माझ्या आईची देखील तीच इच्छा होती. माझी आई मला दुर्गापूजेच्या जत्रेत खेळण्याची बंदुक घेऊन देत असे आणि आसाम पोलिस दलात भरती होऊन चांगली व्यक्ती होण्यासाठी बजावत असे.” हिमा दास हीने, पोलिसांसाठी काम करताना आपला खेळ बिघडू देणार नाही असे देखील सांगितले. आपल्या खेळाने आसाम राज्याला क्रिडा क्षेत्रात हरियाणा सारखे देशात उत्तम कामगिरी करणारे राज्य म्हणून दर्जा प्राप्त करून देण्याच निश्चय तिने बोलून दाखवला.

आसामचे मुख्यमंत्री सोनोवाल यांच्यामते, हिमा दास हीची डीएसपी पदी झालेली नियुक्ती अगामी काळातील क्रिडापटूंसाठी प्रेरणादायी ठरेल. याबाबत सोनोवाल यांनी ट्वीट देखील केले आहे.

हिमा दास हीला तिचे मूळ गावाच्या नावावरून ‘धिंग एक्सप्रेस’ या नावाने ओळखली जाते. २०१८ मध्ये आशियाई क्रिडा स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे, तर जकार्ता येथे झालेल्या स्पर्धेत स्त्रीयांच्या ४०० मीटर रिले आणि मिक्स ४०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. आता ती लवकरच होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकची तयारी करत आहे.

Exit mobile version