मध्य आशियामधील देश असलेल्या ताजिकिस्तानमध्ये हिजाब आणि बुरख्यासारख्या इस्लामिक पोशाखावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुस्लीमबहुल देश असलेल्या ताजिकिस्तानमध्ये संसदेने हा निर्णय घेतला आहे. ताजिकिस्तानमध्ये संसदेत याबाबत कायदा मंजूर करण्यात आला असून त्यामुळे आता या कायद्याची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. शिवाय या महत्त्वाच्या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
ताजिकिस्तान देश हा सोव्हिएत युनियनपासून वेगळा झालेला आहे. अफगाणिस्तान देशाच्या सीमा या देशाला लागून आहेत. शिवाय हा देश मुस्लीम बहुल आहे. शिवाय बाजूच्या तालिबान शासित अफगाणिस्तानमध्ये बुरखा घालणे अनिवार्य आहे. ताजिकिस्तानच्या संसदेच्या वरच्या सभागृह मजलिसी मिलीने १९ जून रोजी विधेयक मंजूर केले. ज्यामध्ये ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अझहा दरम्यान मुलांच्या परदेशी पोशाखावर बंदी घालण्याची तरतूद आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह मजलिसी नमोयांदगोन यांनी ८ मे रोजीच विधेयक मंजूर केले होते आणि बुरखा आणि हिजाब यांसारखे विदेशी कपडे घालण्यावर बंदी घालण्याची शिफारस केली होती.
विधेयकावरील चर्चेदरम्यान, ताजिकिस्तानच्या संसदेने सांगितले की, महिलांचे चेहरे झाकणारा बुरखा हा ताजिक परंपरा किंवा संस्कृतीचा भाग नाही. त्यामुळे या विदेशी पोशाखांवर बंदी घातली आहे. अध्यक्ष रुस्तम इमोमाली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदेच्या १८ व्या अधिवेशनात सांस्कृतिक पद्धती, मुलांचे संगोपन करताना शिक्षकांची भूमिका आणि पालकांची कर्तव्ये यांच्याशी संबंधित कायदेही बदलले.
हे ही वाचा:
६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या!
ग्राहकाने ऑर्डर केलेल्या डोसाच्या सांभरमध्ये आढळले ‘मृत उंदीर’
वटपौर्णिमेमुळे मोठा अनर्थ टळला; सोलापुरमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट
‘एआय’च्या माध्यमातून पोलीस दल अधिक प्रभावशाली, कार्यक्षम होणार!
या नवीन नियमांचे कोणी उल्लंघन केले तर त्यांना मोठा दंड ठोठावण्याची तरतूदही कायद्यात करण्यात आली आहे. विधेयकातील तरतुदींनुसार, व्यक्तींना ७,९२० सोमोनीपर्यंत दंड होऊ शकतो, तर कंपन्यांना ३९,५०० सोमोनीपर्यंत दंड होऊ शकतो. माहितीनुसार, ताजिकिस्तानमध्ये लग्न आणि अंत्यसंस्काराच्या मेजवानीवरही बंदी आहे. याशिवाय दाढी ठेवण्यावरही बंदी आहे. म्हणजे पुरुषांनी दाढी करणे आवश्यक आहे. कोणी दाढी ठेवताना दिसल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाते. येथे इस्लामिक पुस्तकांच्या विक्रीवरही बंदी आहे.