कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर ‘छत्रपती शिवाजी महाराज’!

या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मिळालं,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर ‘छत्रपती शिवाजी महाराज’!

काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमे नजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडलं.छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यामुळे प्रेरणा दिली आहे. शत्रूच्या छातीत देशाचा तिरंगा गाडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सैनिकांना प्रेरित करेल त्यांना उर्जा देईल. त्यामुळे शत्रूची आपल्याकडे बघायची हिंमत होणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काश्मीर मधील कुपवाडा येथे बसविण्यासाठी आला आहे. २० ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई राजभवन येथून समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारुढ पुतळ्याचे ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात स्वागत करण्यात आले. तेथून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखवून कुपवाडाकडे हा पुतळा मार्गस्थ करण्यात आला होता. यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.छत्रपतींचा हा पुतळा प्रेरणादायी आहे. तसेच या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मिळाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

लाल चौकात सामान्य माणसांना जाणे कठीण होते. तिथे पंतप्रधानांनी तिरंगा फडकवला आहे. महाराष्ट्र आणि काश्मीरचे नाते जुने होते. महाराष्ट्रातील अनेक संस्था काश्मीरमध्ये काम करत आहे. त्यांचे योगदान अतिशय मोठे आहे, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

हे ही वाचा:

दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश

बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून समन्स

छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान स्फोट

नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यात आठ हजार घरांचे नुकसान!

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज या नावातच ऊर्जा आहे. त्यांच्या पुतळा हा प्रेरणादायी असून वाईट नजरेने देशाकडे पाहणाऱ्यांसाठी इशारा आहे. महाराष्ट्राच्या सरकारची कधीही मदत लागली तर आम्ही जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत आम्ही तुमच्या सदैव सोबत राहू. ४१ आर आर ही बटालियन नेहमीच तयार असते, ते पुढे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याची वैशिष्ट्य
कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन यंदाच्या पाडव्याच्या दिवशीच करण्यात आले होते. त्यासाठी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणण्यात आली होती. हा पुतळा साडे दहा फूट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ बाय ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे.

पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलिकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने असावे अशापद्धतीने पुतळा बसविण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १८०० ट्रक माती टाकून भराव करण्यात आला. शिवाय याभागातील हवामान, भूस्खलन याबाबी पाहता पक्के बांधकाम करून पाया तयार करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

Exit mobile version