इस्रायलकडून हिजबुल्लाच्या मीडिया संबंध प्रमुखाचा खात्मा

मध्य बेरूतमधील आयडीएफच्या हल्ल्यात मोहम्मद अफिफ ठार

इस्रायलकडून हिजबुल्लाच्या मीडिया संबंध प्रमुखाचा खात्मा

लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात रविवारी हिजबुल्लाचा मीडिया संबंध प्रमुख मोहम्मद अफिफ ठार झाल्याची माहिती आहे. टाइम्स ऑफ इस्रायलने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, हिजबुल्लाने मोहम्मद अफिफच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

वृत्तानुसार, मध्य बेरूतमधील सीरियन बाथ पार्टीच्या मुख्यालयावर आयडीएफच्या हल्ल्यात अफिफ मारला गेला. इस्रायलने हिजबुल्लाच्या प्रवक्त्याच्या हत्येची पुष्टी अद्याप केलेली नाही. अफिफ याने हिजबुल्लासाठी अनेक पत्रकार परिषदा आयोजित केल्या होत्या. इस्त्रायलच्या बॉम्बस्फोटासंदर्भात त्याने अनेकदा माहिती दिली होती. अफिफने सशस्त्र गटासाठी उच्च माध्यम संबंध अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी अनेक वर्षे हिजबुल्लाच्या अल- मनार टेलिव्हिजन स्टेशनचे व्यवस्थापन केले होते. आफिफने पत्रकारांना नुकत्याच दिलेल्या एका निवेदनात हिजबुल्लाकडे इस्रायलविरुद्ध दीर्घ युद्ध लढण्यासाठी पुरेशी शस्त्रे असल्याचे सांगितले होते.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदींकडून ‘द साबरमती रिपोर्ट’चे कौतुक, म्हणाले- ‘सत्य बाहेर येत आहे’

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक

केजरीवालांना धक्का, मंत्री कैलाश गेहलोतांचा पदाचा राजीनामा, पक्षही सोडला

मोदी म्हणाले म्हणून, १२ वर्षानंतर राहुल गांधींची बाळासाहेबांना आदरांजली!

रविवारी, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर आग फेकल्याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली. शनिवारी रात्री सीझेरिया येथील नेतन्याहू यांच्या खाजगी घरावर दोन फ्लेअर फेकले गेले, जे घराच्या अंगणात आले. त्यावेळी पंतप्रधान आणि त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते. नेतन्याहू यांच्या खाजगी निवासस्थानावर या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीला हिजबुल्लाने ड्रोनच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. ड्रोन धडकून घरातील एका खोलीच्या खिडकीला तडे गेले होते परंतु, ड्रोन आत प्रवेश करण्यात अयशस्वी झाला.

Exit mobile version