हिजबुल्लाची पळापळ, डेप्युटी सेक्रेटरी कासेम लेबेनॉनमधून सटकला

इस्रायलकडून हत्येच्या भीतीने इस्लामिक रिपब्लिकच्या नेत्यांनी बदलीचे आदेश दिल्याची माहिती

हिजबुल्लाची पळापळ, डेप्युटी सेक्रेटरी कासेम लेबेनॉनमधून सटकला

हिजबुल्लाचा सेकंड-इन-कमांड आणि डेप्युटी सेक्रेटरी जनरल नायम कासेम याने लेबनॉनमधून पळ काढल्याची माहिती आहे. इस्रायलकडून सातत्याने लेबनॉनस्थित हिजबुल्ला दहशतवादी गटाच्या ठिकाणांवर होत असलेले हल्ले आणि हिजबुल्ला, हमासच्या नेत्यांना ठार करण्यात येत असलेल्या भीतीपोटी कासेम याने लेबनॉनमधून पळ काढल्याचे बोलले जात आहे. सध्या तो इराणमध्ये असल्याची माहिती आहे. यूएईमधील एरेम न्यूजच्या हवाल्याने ‘इंडिया टुडे’ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

नायम कासेम याने इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी वापरलेल्या विमानातून ५ ऑक्टोबर रोजी बेरूत सोडले, अशी माहिती देण्यात येत आहे. लेबनॉन आणि सीरियाच्या भेटीसाठी मंत्री आले होते. इस्रायलकडून हत्येच्या भीतीने इस्लामिक रिपब्लिकच्या सर्वोच्च नेत्यांनी त्याच्या बदलीचे आदेश दिले होते, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.

हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला याची इस्रायलकडून हत्या झाल्यानंतर नायम कासेम याने तीन भाषणे दिली होती. त्यातील एक बेरूतमधून तर इतर दोन तेहरानमधून दिली होती. हमाससोबतच्या युद्धाच्या सुरुवातीपासूनचं इस्रायलने हिजबुल्लाच्या अनेक नेत्यांची हत्या केली आहे. हिजबुल्लाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक, नायम कासेम हा नसरल्लाच्या हत्येनंतर अधिक सार्वजनिक भूमिका घेत आहे.

हे ही वाचा : 

गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरसह सहा स्थलांतरित कामगारांचा मृत्यू

नवी मुंबई विमानतळाच्या परिसरातील टेकडीवर उभा राहिला ‘अनधिकृत भव्य दर्गा’

भागलपूरच्या प्रसिद्ध शिवशक्ती मंदिरात तोडफोड, हिंदू समाजाकडून निदर्शने!

मुंबई विमानतळावर २ किलो सोने जप्त!

कासेम याच्या राजकीय सक्रियतेची सुरुवात लेबनीज शिया अमल चळवळीने झाली. इराणच्या इस्लामिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर त्याने १९७९ मध्ये गट सोडला. १९८२ मध्ये इस्रायलने लेबनॉनवर आक्रमण केल्यानंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या हिजबुल्लाच्या स्थापनेला कारणीभूत ठरलेल्या बैठकांमध्ये त्याने भाग घेतला, अशी बातमी रॉयटर्सने दिली आहे.

Exit mobile version