हिजबुल्लाचा प्रमुख सय्यद नसरल्ला ‘ठीक-ठाक’, परंतु मुलगी झैनब ठार?

इस्रायल वृत्तवाहिनी चॅनेल-१२ ने केला मृत्यूचा दावा

हिजबुल्लाचा प्रमुख सय्यद नसरल्ला ‘ठीक-ठाक’, परंतु मुलगी झैनब ठार?

इस्रायलने मागील काही दिवसांपासून लेबेनॉनवर हल्ले अधिक तीव्र केले आहेत. इस्रायलने काल (२७ सप्टेंबर) राजधानी बैरुतवर केलेल्या हल्ल्यात इराण-समर्थित हिजबुल्ला गटाचे मध्यवर्ती मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यात हिजबुल्ला संघटनेचा प्रमुख सय्यद हसन नसरल्ला हा ठार झाल्याच्या बातम्या होत्या, आता जिवंत असल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात सय्यद नसरल्लाची मुलगी झैनब नसरल्ला ही ठार झाल्याची बातमी समोर येत आहे.

इस्रायल वृत्तवाहिनी चॅनेल-१२ ने याबाबत वृत्त दिले आहे. बैरुतमध्ये करण्यात आलेल्या शुक्रवारच्या इस्रायली हल्ल्यात सय्यद हसन नसरल्लाची मुलगी झैनब नसरल्ला मारली गेल्याचा दावा चॅनेलने केला आहे. झैनबच्या मृत्यूची बातमी खरी ठरली तर हिजबुल्लाला मोठा धक्का असेल. एवढेच नाहीतर इस्रायलसोबत सुरु असलेल्या युद्धावरही याचा परिणाम होवू शकतो, असे बोलले जात आहे. दरम्यान, हिजबुल्ला अथवा लेबनीज अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिलेला नाही.

हे ही वाचा : 

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भारताने पाकिस्तानला फटकारले !

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, लष्कराच्या तीन जवानांसह एक पोलीस जखमी!

‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीसांची चिंता करू नये!

सेक्युलर फॅब्रिकच्या चिंध्या कुणी केल्या ते पप्पांना विचारा!

दरम्यान, इस्रायलच्या कालच्या हल्ल्याबाबत लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या घटनेत किमान नऊ लोकांचा मृत्यू आणि ९० हून अधिक जखमी झाले आहेत. शोध आणि बचाव कार्ये रात्रभर सुरूच होती. हे हवाई हल्ले हेज्बुल्लाच्या वरिष्ठ कमांडर्सवर होते. हल्ला झाला तेव्हा अतिरेकी गटाचा नेता हसन नसरल्ला मुख्यालयात होता, यामध्ये तो मारला गेला असे वृत्त होते. मात्र, दहशतवादी गटाने याचा इन्कार केला आहे.

इस्त्राईल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने सांगितले की, हल्ल्यात हिजबुल्लाचे अनेक कमांडर आणि सदस्य मारले गेले आहेत. यामध्ये हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र युनिटचा प्रमुख मुहम्मद अली इस्माइल याचाही समावेश आहे.

 

Exit mobile version