लेबेनॉनमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या कारवाईत हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हसन नसरल्ला ठार झाला आहे. इस्रायलने लेबेनॉनची राजधानी असलेल्या बैरुतवर बॉम्ब हल्ले सुरू ठेवले असून त्यात हिजबुल्लाचे मुख्यालय लक्ष्य करण्यात आले. त्यात नसरल्ला ठार झाला. त्याच्या मृत्यूची बातमी येत असली तरी हिजबुल्लाकडून त्याची खात्री केली जात नव्हती. मात्र आता हिजबुल्लानेच ते स्पष्ट केले आहे. नसरल्लासोबत त्याची मुलगी झैनब, हिजबुल्लाच्या दक्षिण आघाडीचा कमांडर अली कारकी आणि इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डचा उपप्रमुख अब्बास निलफिरुशान यांनाही संपविण्यात आले आहे.
गेली तीन दशके या संघटनेने राजकीय आणि लष्करी पद्धतीने आपले साम्राज्य उभारले होते. ते आता संपुष्टात आले आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे की, हिजबुल्लाने नसरल्लाच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे. सोबत कारकी याचाही अंत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी हाणामारी, जिथे काँग्रेस तिथे स्थिरता नाही!
आरोपी असलेल्या मुख्यमंत्र्याच्या पाठीशी राहुल गांधी आहेत का ?
कुलगाममध्ये दोन दहशतवादी टिपले, एके-४७सह दारूगोळा जप्त!
‘मोहम्मद युनूस’ हे हिंदूंचे मारेकरी!
हिजबुल्लाने म्हटले आहे की, नसरल्ला हा आपल्या सहकाऱ्यांप्रमाणेच शहीद झाला आहे. अल मनार या हिजबुल्लाच्या न्यूज एजन्सीने या घटनेनंतर कुराणमधील वचने आळवायला सुरुवात केली.
नसरल्लाच्या मृत्यूनंतरही हिजबुल्लाने इस्रायलविरोधातील ही लढाई सुरूच राहील असे म्हटले आहे. आम्ही पॅलेस्टिन आणि गाझाच्या समर्थनार्थ लढत राहू असे या संघटनेने म्हटले आहे.