भारताचा ‘परममित्र’ असलेला पाकिस्तान आगामी काळात नरमण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टीकोनातून होणारे नुकसान पाहता पाकिस्तान हा निर्णय घेऊ शकतो. पाकिस्तानला सध्या कापसाची कमतरता भासतेय. मात्र पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कापड उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे पाकिस्तान आगामी काळात भारताकडून कापसाची आयात सुरु करू शकतो. असे पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ ने म्हटले आहे. त्यासाठी तसा प्रस्तावही पाकिस्तानकडून दिला जाऊ शकतो.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे संबंध अतिशय ताणलेले आहेत, हे सर्वश्रूत आहे. २०१९ मध्ये केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर तर पाकिस्तानची असहाय्यता अधिकच वाढली आहे. त्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत व्यापार करणे बंद केले. पाकिस्तानने रेल्वेसेवासुद्धा बंद केली. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे सध्या दोन्ही देशांतील व्यापारविषयक व्यवहार ताणलेले आहेत. मात्र, या वर्षात पाकिस्तानला १.२ कोटी बेल्स कापसाची गरज आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सध्या फक्त ७.७ कोटी बेल्स कापसाचे उत्पादन घेऊ शकणार आहे. उर्वरित ५.५ कोटी ब्लेस कापसाची पाकिस्तानला आयात करावी लागेल. त्यासाठी भारत हा योग्य स्त्रोत असल्याचे पाकिस्तामध्ये सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तान भारताकडे मदतीसाठी विचारणा करु शकतो.
हे ही वाचा:
भारत आणि पाकिस्तान हे देश शेजारील राष्ट्र आहेत. त्यामुळे इतर दूरच्या देशांकडून आयात करण्यापेक्षा कापूस आयातीसाठी भारत हा योग्य पर्याय असल्याचे पाकिस्तानला वाटते. सध्या पाकिस्तान हा कापसाची आयात अमेरिका, ब्राझील, उझबेकिस्तान या देशांकडून करतो. या देशांसोबत व्यवहार करणे पाकिस्तानला महाग पडते. तसेच आयात केलेला माल पाकिस्तानमध्ये दाखल होण्यास तब्बल 2 महिने लागतात. हाच माल भारतातून आयात केल्यास त्याला पाकिस्तानमध्ये जायला फक्त तीन ते चार दिवस लागतात. त्यामुळे भारतातून आयात करणे हे पाकिस्तानसाठी अनेक अंगांनी किफायतशीर आहे.
पाकिस्तानमध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात पसरलेला असून जवळपास तीस टक्के उद्योग फक्त वस्त्रोद्योगामुळे निर्माण होतो असे अनुमान आहे. कापूसनिर्मितीमध्ये भारत, बांग्लादेश यांनतर पाकिस्तानचा नंबर येतो. पाकिस्तानमधून जी निर्यात केली जाते त्यातील साठ टक्के निर्यात ही वस्त्रोद्योगाशी निगडीत उत्पादनांची आहे. एकूण निर्मीतीमध्ये वस्त्रोद्योगाचे योगदान ४६ टक्के आहे.
ही सर्व माहिती लक्षात घेता, भारताशी आयात करार केला नाही तर पाकिस्तानला ते महागात पडू शकते. पाकिस्तानातील तब्बल १.५ कोटी रोजगार धोक्यात येऊ शकतात. तसेच, पाकिस्तानचे दोना लाख कोटींचे नुकसानही होऊ शकते. त्यामुळे आगामी दिवसांत पाकिस्तान भारताला कापूस निर्यात करण्याची विनंती करु शकतो.