युक्रेनमध्ये हेलिकॉप्टरला अपघात, गृहमंत्र्यांसह १६ जणांचा मृत्यू

युक्रेनमध्ये हेलिकॉप्टरला अपघात, गृहमंत्र्यांसह १६ जणांचा मृत्यू

युक्रेनची राजधानी कीवमध्ये हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झाला आहे. युक्रेनची राजधानी कीवच्या बाहेर ब्रोव्हरी टाऊनमध्ये बुधवारी हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात युक्रेनचे गृहमंत्री आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

हे हेलिकॉप्टर निवासी इमारतीजवळ कोसळले. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे हेलिकॉप्टरन कीवपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रोव्हरी शहरातील निवासी भागात कोसळले. हेलिकॉप्टर ज्या इमारतीवर पडले तेथे पाळणाघर होते. पाळणाघरातील सर्व मुले आणि कर्मचाऱ्यांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले आहे. अपघातस्थळी पोलिस आणि डॉक्टर कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकारांचे कान टोचले!

कम्पाउण्डरला डॉक्टरवर भरवसा नाही का?

समीर मयेकर, निकाळजे यांच्या विज्ञान प्रकल्पाचे यश

दाव्होसमध्ये १ लाख ३७ हजार कोटींचे करार

हेलिकॉप्टर अपघातात गृहमंत्री डेनिस मोनास्टिर्स्की आणि उपमंत्री किरिलो टिमोशेन्को यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.अपघातग्रस्त हेलिकॉप्टर युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेचा भाग होते. अपघाताचे कारण सध्या स्पष्ट झालेले नाही. या घटनेवर रशियाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही किंवा युक्रेनने हा रशियन हल्ला असल्याचे म्हटले आहे. युक्रेनच्या राष्ट्रपती कार्यालयाचे उपप्रमुख किरिलो तिमोशेन्को यांनी सोशल मीडियावर लिहिले की सरकार अपघातातील बळींची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे.

Exit mobile version