ब्राझीलमध्ये मुसळधार पावसाने हाहाःकार माजवला असून मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर अली आहे. ब्राझीलमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दक्षिणेकडील रिओ ग्रांदे डो सुल या राज्याला मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत. तर, ५७ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
ब्राझीलमध्ये जोरदार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ब्राझीलमध्ये या आठवड्यात झालेल्या पावसामुळे ५७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, हजारो लोक बेपत्ता आहेत. ब्राझीलमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीदेखील झाली आहे. सध्या बचाव पथकाकडून शोधकार्य आणि मदत कार्य सुरू आहे. आकडेवारीनुसार, महाभयंकर पुरामुळे २८१ नगरपालिका प्रभावित झाल्या आहेत आणि कमीत कमी ७४ लोक जखमी झाले आहेत. ६७ हजाराहून अधिक लोक प्रभावित झालेल्या भागात स्थानिक सरकारने आपत्तीची स्थिती घोषित केली आहे आणि ४ हजार ५०० हून अधिक लोक तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये आहेत.
हे ही वाचा:
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू!
गुजरातवरील विजयामुळे बेंगळुरूच्या ‘प्लेऑफ’मध्ये जाण्याच्या आशा जिवंत!
‘रोहित वेमुलाच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी’
तमिळनाडूमध्ये काँग्रेसनेत्याचा अर्धवट जळालेला मृतदेह
शनिवारी सकाळी, जोरदार पावसामुळे गुआइबा सरोवरातील पाण्याची पातळी पाच मीटरने वाढली, ज्यामुळे राज्याची राजधानी पोर्टो अलेग्रेला धोका निर्माण झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रिओ ग्रांदे डो सुल राज्यात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. याचा परिणाम नदीच्या बंधाऱ्यांवरही होत आहे. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असलेल्या पोर्टो अलेग्रेला पुराचा विशेष फटका बसला. पुरामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, घरापासून ते रस्त्यांपर्यंत सर्व काही पाण्याने भरलेले दिसत आहे. शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. रस्त्यांवर बोटी फिरत आहेत. बुडून घरे उद्ध्वस्त झाली.