27 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरक्राईमनामाभारतात मुलाला मारल्यानंतर लंडनमध्ये मौजमजा

भारतात मुलाला मारल्यानंतर लंडनमध्ये मौजमजा

ऑस्ट्रेलिया पाठवले ६०० कोटींचे कोकेन

Google News Follow

Related

लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या विवाहित दाम्पत्याबाबत धक्कादायक बाब उघड झाली आहे. दोघांना इंग्लंडहून ऑस्ट्रेलियाला ६०० कोटी किमतीच्या अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरवले गेले आहे. या दाम्पत्यावर गुजरातमध्ये दुहेरी हत्याकांडाचा आरोपही आहे. भारताने अनेकदा विनंती अर्ज करूनही ब्रिटनच्या न्यायालयाने त्यांचे भारतात प्रत्यार्पण करण्यास नकार दिला होता. आता लंडनहून सिडनीत मालवाहू विमानांमधून ६०० कोटी मूल्याच्या कोकेनची तस्करी केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

नैरोबीत जन्मलेली ५९ वर्षीय ब्रिटिश भारतीय आरती धीरचे कुटुंब गुरुदासपूरचे आहे. महिलेचा पती ३५ वर्षीय कवलजीतसिंग रायजादा गुजरातच्या केशोद येथील निवासी आहे. तो भारतीय नागरिक असून हे दोघेही इंग्लंडमध्ये राहातात. ५१४ किलो कोकेन ऑस्ट्रेलियाला पाठवल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. ते एका कंपनीच्या माध्यमातून कोकेन पाठवत असत. त्यांनी धातूच्या टूलबॉक्समध्ये लपवून कोकेन पाठवले होते.

मार्च २०२१मध्ये कोकेन सिडनीला पोहोचले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सीमा दलाने केलेल्या चौकशीत या दोघांचा हात असल्याचे आढळले होते.

हे ही वाचा:

चादर, उशी आणि वॉशिंग मशिनमध्ये कपडे

ईडीच्या छापेमारीनंतर झारखंडचे मुख्यमंत्री बेपत्ता; विमानतळावर अलर्ट जारी

‘स्थगिती, लांबलचक सुनावण्यांमुळे निकालांना उशीर’

एक मुरलेला नेता दुसरा उरलेला…

भारताने सन २०१९मध्ये गुजरातमधील दुहेरी हत्याकांडाच्या आरोपाप्रकरणी या दाम्पत्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. त्यांनी नीतीश मुंड याच्यासोबत मिळून १२ वर्षीय अनाथ मुलगा गोपाल सेजानी आणि मेहुणा हरसुखभाई छगनभाई करदानी याची हत्या केल्याचा आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. गोपाळ सेजानी याला आरती धीर हिने दत्तक घेतले होते. आरती धीर हिने गोपाळसाठी एक कोटी ३० लाखांचा विमा घेतला होता. विम्याचे पैसे मिळवण्यासाठी त्याने मुलाची हत्या केली होती. गोपाळ आणि करदानी यांच्या हत्या करण्यासाठी मुंड याला पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा