जगातील सर्वात मोठे पक्ष्याचे शिल्प बघितले आहे का?

जाणून घ्या याचा थेट संबंध इतिहासाशी आहे

जगातील सर्वात मोठे पक्ष्याचे शिल्प बघितले आहे का?

भारत देशाला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आपल्या देशाला चांगली संस्कृती आहे. आपल्याकडे प्राचीन मंदिरे , किल्ले, गड , अनेक राजवाडे असा ऐतिहासिक ठेवा भरपूर आहे. याशिवाय अनेक पर्यटन स्थळांसाठी आपला देश सुप्रसिद्ध आहे. आता या पर्यटन स्थळामध्ये अजून एक नाव सामील होणार आहे. केरळमध्ये आता जगातील सर्वात मोठे पक्ष्याचे शिल्प असणाऱ्या अशा या पार्कचा या यादीत समावेश होणार आहे. याशिवाय या पार्कचा आणि रामायणाचा थेट संबंध आहे. केरळमधील कोल्लम येथील ‘जटायू नेचर पार्क’ प्रसिद्ध आहे.

येथे पर्यटनासाठी जगातल्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. या पार्कची विशेषता म्हणजे रावणाने जेव्हा सीता मातेचे हरण केले तेव्हा तिला जटायूने आपल्या पंखांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. जटायूला या झटापटीत खूप दुखापत झाली रावणाने जटायूचे पंख कापले म्हणूनच हे जटायू पार्क उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे पार्क ४०० फूट उंचीवर उभारण्यात आले असून २०० फूट लांब , १५० फूट रुंद आणि ७० फूट उंच अशी जटायू पक्ष्याचे शिल्प येथे उभारण्यात आले आहे. हे जटायू उद्यान तयार करण्यासाठी तब्बल दहा वर्षांचा कालावधी लागला. यामधील जटायू पक्ष्याचे शिल्प सर्वात मोठ्या शिल्पांपैकी एक असून जगातील सर्वात मोठे असे हे शिल्प आहे.

हे ही वाचा:

म्यानमारमध्ये बौद्ध भिक्षुंना घातल्या गोळ्या

मुंबई-गोवा तेजतर्रार प्रवासासाठी आणखी नऊ महिने प्रतिक्षा H3N2 व्हायरस संसर्गावर कोरोनालस प्रभावी? काही आमदार परत येतील म्हणूनच १६ आमदारांना नोटीस दिली संपूर्ण उद्यान हे ३०००० स्केअर फूट परिसरात पसरलेले आहे. १४ टेनिस कोर्ट मावतील एवढा लांब परिसर हा पसरला आहे.  रामायणातील कथेप्रमाणे रावणाने जटायूचे पंख कापल्यावर जटायू पक्षी एका डोंगरावर पडल्याचे स्थानिकांचे मत आहे. सीतामातेच्या रक्षणार्थ त्याने रावणाशी युद्ध केले. प्रभू श्रीरामाला त्यांनी सीतामातेच्या अपहरणाची माहिती दिली त्यानंतर त्याने टेकडीवर शेवटचा श्वास घेतला म्हणूनच तिथे ते शिल्प उभारण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते, शिल्पकार आणि गुरुचंद्रिका बिल्डर्स अँड प्रॉपर्टीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव आंचल यांच्या संकल्पनेंतून हे पार्क उभारण्यात आले असून, हा भव्य पक्ष्याचे शिल्प साकारण्याची त्यांचीच कल्पना आहे. हे शिल्प बनायला सात वर्षे लागल्याचे त्यांनी सांगितले. हे शिल्प कॉंक्रिटचे असून स्टोन फिनिशिंग देऊन तयार करण्यात आली आहे. हे शिल्प साकारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला कारण ४०० फूट उंचीवर सर्व साहित्य न्यायला लागत होते. जे काम फार अवघड होते. याशिवाय या शिल्पाच्या आत डिजिटल म्युझियम सुद्धा साकारले आहे. ज्यामध्ये रामायणाची माहिती पण दिली आहे.

Exit mobile version