नुकतीच विश्वसुंदरी २०२१ म्हणजेच ‘मिस युनिवर्स २०२१’ची स्पर्धा इस्रायलमध्ये पार पडली. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला हा किताब मिळाला आहे. भारताच्या हरनाज संधूने हा किताब भारताच्या नावे केला आहे. २१ वर्षीय हरनाजला १२ डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा मुकुट देण्यात आला. याआधी २१ वर्षांपूर्वी लारा दत्ताने २००० साली ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला होता.
The new Miss Universe is…India!!!! #MISSUNIVERSE pic.twitter.com/DTiOKzTHl4
— Miss Universe (@MissUniverse) December 13, 2021
हरनाजच्या विजयाची बातमी मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली. हरनाज संधूने नुकताच ‘मिस डीवा मिस यूनिवर्स इंडिया २०२१’ किताब आपल्या नावे केला होता. त्यानंतर हरनाजने ‘मिस युनिवर्स’ स्पर्धेची तयारी सुरु केली होती. यंदाचे विश्वसुंदरी स्पर्धेचे हे ७०वे वर्ष आहे. इस्रायलमध्ये आयोजित कार्यक्रमात हरनाजला मुकुट घातला गेला तो क्षण पोस्टमध्ये शेअर केला आहे. “नवीन मिस युनिव्हर्स आहे…इंडिया,” असे कॅप्शन त्या व्हिडीओला देण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी सज्ज झाली काशी
संजय राऊत यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल
वाघाने बंद केले वऱ्हाडाला; घरातच लागले लग्न
‘म्हाडा’ भरती परीक्षेत दलालांचा सुळसुळाट? आव्हाड म्हणतात…
कोण आहे हरनाज संधू?
हरनाज संधूचा जन्म चंदीगडच्या शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाजने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तीने २०१७ मध्ये ‘मिस चंदीगड’चा किताब जिंकला होता. २०१८ मध्ये ‘मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया’ अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित किताब जिंकल्यानंतर, हरनाजने ‘मिस इंडिया’ २०१९ मध्ये भाग घेतला. तिथे तिने टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले होते. या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने ‘मिस दिवा युनिव्हर्स इंडिया’ २०२१ चा किताब पटकावला. सध्या ती पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.