मिस युनिव्हर्स २०२१ च्या सत्तराव्या आवृत्तीचा समारोप १३ डिसेंबर २०२१ रोजी इस्रायलमधील इलात येथे झाला. भारताची हरनाज संधू हिने मिस युनिव्हर्स हा मानाचा किताब जिंकला. हरनाजने २१ वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा झगमगता मुकुट भारतात आणला आहे. यानिमित्ताने जगभरातून हरनाजचे कौतुक होते आहे. पण या मिस युनिव्हर्सला किती मानधन मिळते, तिचा मुकुट किती किमतीचा असतो, तिला आणखी कोणते लाभ मिळतात, चला जाणून घेऊया..
पुरस्कार सोहळ्यादरम्यान, हरनाझ संधूला मेक्सिकोच्या माजी मिस युनिव्हर्स अँड्रिया मेझा यांनी झळाळता मुकुट घातला. तिच्या प्रतिष्ठेच्या विजेतेपदाचा एक भाग म्हणून तिला पुष्पगुच्छही देण्यात आला.
मिस युनिव्हर्स पुरस्काराची रक्कम सुमारे २,५०,००० डॉलर इतकी आहे. ज्यात भत्ते आणि फायदे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मिस युनिव्हर्स २०२१ चा मुकुट हा आजपर्यंतचा सर्वात महागडा मुकुट आहे. २०१९ च्या सौंदर्य स्पर्धेत हा मुकुट पहिल्यांदा वापरण्यात आला होता. एका वर्षासाठी मिस युनिव्हर्सचा मुकुट हरनाज संधूकडे असणार आहे. जो १८ कॅरेट सोन्यात तयार केलेला आहे आणि त्यात १,७७० हिरे आहेत.
एकूण १.८ कोटी रुपये बक्षीस रकमेचा भाग म्हणून मिस युनिव्हर्सला मिळणार आहे. एका वर्षासाठी सहा आकड्यांचा पगार (त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही) दिला जाणार आहे. त्याशिवाय न्यूयॉर्क शहरातील मिस युनिव्हर्स अपार्टमेंटमध्ये एक वर्ष मोफत मुक्काम तिला करता येणार आहे. तसेच सहाय्यक, मेकअप कलाकार आणि बऱ्याच सुविधा तिला मिळणार आहेत. एक वर्षासाठी तिला मेकअप आणि केस उत्पादने, शूज, कपडे, दागिने इ. पुरवठा केला जाईल.
हे ही वाचा :
सात महिन्यांच्या संसारात शिरले संशयाचे भूत आणि झाले असे विपरित…
जम्बो कोविड सेंटरच्या ११ कोटी भाड्याबद्दल स्थायी समितीला माहितीच नाही!
सोनियांच्या घरी शरद पवार भेटीला
एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
मिस युनिव्हर्सला मॉडेलिंग पोर्टफोलिओ तयार करण्यात मदत करण्यासाठी जगभरातील सर्वोत्तम छायाचित्रकारांसोबत काम करण्याची संधी मिळते.अन्य कार्यक्रम, पक्ष, प्रीमियर, स्क्रीनिंग, कास्टिंग आणि बऱ्याच उपक्रमात तिला प्रवेश दिला जातो. हॉटेल निवास आणि भोजनासह जगभरात विनामूल्य प्रवास करता येतो. व्यावसायिक स्टायलिस्ट, पोषणतज्ज्ञ यांची सुविधा उपलब्ध केली जाते. तसेच, ज्वेलरी ब्रँड मौवाडसह मिस युनिव्हर्स २०२१ प्रायोजकांद्वारे प्रदान केलेल्या भत्त्यांचा लाभ मिळतो.
२००० मध्ये लारा दत्ता आणि १९९४ मध्ये सुष्मिता सेन यांच्यानंतर प्रतिष्ठित विजेतेपद जिंकणारा हरनाज संधू ही तिसरी भारतीय आहे.