26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाहरदीपसिंग निज्जर कॅनडात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र चालवायचा!

हरदीपसिंग निज्जर कॅनडात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र चालवायचा!

निज्जरने दहशतवादी अर्शदीप सिंग दल्लासह खलिस्तानी टायगर फोर्स (केटीएफ)ची स्थापना केली

Google News Follow

Related

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात हत्या झाल्यानंतर या हत्यमागे भारत सरकारच्या एजंटचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला आहे. परिणामी कॅनडा आणि भारतामधील द्विराष्ट्रीय संबंधही ताणले गेले आहेत. तर, कॅनडा हा दहशतवाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप भारताने केला आहे. यानिमित्ताने हरदीप निज्जरच्या कारवायांची माहिती समोर येऊ लागली आहे.

 

हरदीपसिंग निज्जर याने जगतारसिंग तारा याच्या नेतृत्वाखालील बब्बर खालसा इंटरनॅशनल या संघटनेत सहभागी होऊन खलिस्तानी दहशतवादी कारवायांना सुरुवात केली होती. त्यानंतर निज्जर याने दहशतवादी अर्शदीप सिंग दल्ला याच्या सोबतीने खलिस्तानी टायगर फोर्स (केटीएफ) या दहशतवादी संघटनेची स्थापना केली होती. या संघटनेने सन २०१४मध्ये भटिंडाच्या फिलौर येथील हिंदू पुजारी मनोहर लाल यांची हत्या केली होती. तसेच, काहींचे अपहरण आणि हत्याही केली होती.

 

डिसेंबर, २०१५मध्ये हरदीपसिंग निज्जर याने कॅनडा येथील ब्रिटिश कोलंबिया येथील मिशन हिल्स मध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारा तळ उभारला होता. तिथे त्याने मनदीप सिंग धालिवाल आणि अन्य कट्टरवादी तरुणांना एके-४७, स्नायपर रायफल्स आणि पिस्तुल चालवण्याचे प्रशिक्षण दिले होते. निज्जरकडून चालवल्या जाणाऱ्या या प्रशिक्षण तळाचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाला होता.

 

हे ही वाचा:

स्लीप मोडवर असलेल्या प्रज्ञान, विक्रमशी संपर्क करण्याचा इस्रोचा प्रयत्न

नापसंतीच्या शिक्क्याला ट्रुडो स्वतःच कारणीभूत

‘लोकशाही’ चॅनेलवर ७२ तासांची बंदी

लाइनमध्ये सतरा तास उभे राहून आयफोन १५ खरेदी!

सन २०१६मध्ये निज्जर याने धालिवाल याला पंजाबमधील शिवसेना नेत्याची हत्या करण्यासाठी पाठवले होते. मात्र त्याला पंजाब पोलिसांनी पकडले. सन २०१६मध्ये भारत सरकारने निज्जरकडून कॅनडात चालवल्या जाणाऱ्या प्रशिक्षण तळाबाबत कळवले होते. तसेच, त्याचा कॅनडियन पासपोर्ट नंबर सांगून तो पंजाबमध्ये दहशतवादी हल्ले करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही कळवले होते.

 

 

‘केटीएफचा प्रमुख जगतार तारा याला इंटरपोलने थायलंडमध्ये अटक केल्यानंतर निज्जर याने कॅनडात तरुणांना शस्त्रास्त्रे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मिशन जवळ रेंज उभारून तिथे त्याने मनदीप सिंग आणि अन्य तीन शीख तरुणांना एके-४७ चे प्रशिक्षण दिले आहे. हे तिघे तिथे दररोज तीन ते चार तास गोळीबाराचा सराव करतात,’ असे भारताने कॅनडाला पाठवलेल्या अहवालात नमूद केले आहे. मनदीप आणि निज्जर हे दोघेही नियमितपणे आयएसआयकडून शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानात जात असल्याचेही भारत सरकारने कॅनडा सरकारला पाठवलेल्या अहवालात नमूद केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा