इस्रायल आणि हमासदरम्यान गेल्या ४० दिवसांपासून युद्ध सुरू आहे. इस्रायलच्या लष्कराने गाझा पट्टीमध्ये हमासच्या ठिकाणांवर हवाई हल्ले आणि जमिनीवरील लढाया सुरू ठेवल्या आहेत. इस्रायलने गाझाच्या काही रुग्णालयांजवळही लष्करी कारवाया केल्या. हमासकडून गाझाच्या रुग्णालयांचा वापर लष्करी कारवाया आणि ओलिसांना डांबून ठेवण्यासाठी केला जात असल्याचा दावा सातत्याने इस्रायलकडून केला जात आहे. आता अमरिकेनेही इस्रायलच्या या दाव्याला दुजोरा दिला आहे.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादसंदर्भात माहिती दिली. ‘हमास आणि पॅलिस्टिनी जिहादी गाझा पट्टीमध्ये काही रुग्णालयांचा वापर आपल्या गुप्त लष्करी कारवायांसाठी आणि ओलिसांना लपवून ठेवण्यासाठी करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. यामध्ये अल शिफा रुग्णालयाचाही समावेश आहे. रुग्णालयाच्या इमारतींखाली गुप्त भुयारे आहेत. हमासचे सदस्य गाझा शहरातील अल शिफा रुग्णालयातून एक कमांड आणि कंट्रोल नोडची सूत्रे चालवतात. त्यांच्याकडे शस्त्रे आहेत आणि इथे इस्रायली सैन्य त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी सज्ज आहेत,’ असे पेंटागॉनच्या डेप्युटी प्रेस सेक्रेटरी सबरिना सिंह यांनी सांगितले.
हे ही वाचा:
उबाठा सेनेत उद्धव ठाकरेंसकट सर्व सोंगाडे
पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे केजरीवाल, प्रियांका गांधींना नोटीस
५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले
सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात
हमासने गाझा पट्टीमध्ये भुयारांचे जाळे निर्माण केले आहे. इस्रायलच्या सैन्याने या जाळ्यांना ‘गाझा मेट्रो’ असे नाव दिले आहे. त्यांचा दावा आहे की, त्यांचे हे भुयारांचे जाळे ५०० किमीपर्यंत पसरले आहे. या भुयारांपर्यंत जाण्यासाठी अनेक शाळा, मशिदी आणि रुग्णालयांतूनही मार्ग दिले आहेत. या भुयारांमध्ये रॉकेट आणि दारुगोळाही साठवून ठेवण्यात आला आहे.