हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्याला इस्रायलकडून एअर स्ट्राईकने उत्तर

दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर ‘स्टेट ऑफ वॉर’ची घोषणा

हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्याला इस्रायलकडून एअर स्ट्राईकने उत्तर

इस्रायलने पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर ‘स्टेट ऑफ वॉर’ची घोषणा केली आहे. त्यामुळे गाझा पट्टी आणि आसपासच्या भागात या युद्धाचे तीव्र परिणाम दिसण्याची शक्यता आहे. गाझा स्ट्रिपमधून हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा स्ट्रिपमधून इस्त्रायली भागावर मोठ्या प्रमाणात हल्ले सुरु केले होते.

यानंतर आता इस्रायलने या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे रशिया- युक्रेन युद्धाच्या झळा अद्याप साऱ्या जगाला लागत असताना आता पुन्हा एकदा जगाला आणखी एका युद्धाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीमध्ये एअर स्ट्राईक करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलच्या एअर फोर्सने देखील एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. याठिकाणी असणाऱ्या हमास दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं जात आहे.

हमासच्या दहशतवाद्यांनी ५ हजाराहून अधिक रॉकेट्स इस्त्रायली भागावर डागले. रॉकेट हल्ल्यात एक वृद्ध इस्रायली महिला ठार झाली असून इतर १५ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. देशाच्या दक्षिणेत आणि मध्यवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. लोकांनी घराच्या बाहेर न निघण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये ‘स्टेट ऑफ वॉर’ घोषित

गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

गेल्या काही दिवसांपासून इस्रायलच्या भूमीवर हमासच्या दहशतवाद्यांकडून कारवाया केल्या जात असल्याचे दावे केले जात होते. हे दहशतवादी मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचंही बोललं जात होतं. शनिवारी सकाळी इस्रायलच्या भूमीवर गाझा पट्ट्यातून अनेक रॉकेट्स लाँच करण्यात आले. त्यापाठोपाठ मोठ्या प्रमाणावर गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्यानंतर इस्रायलनं युद्धाची घोषणा केली आहे.

Exit mobile version