इस्रायल-हमास यांच्यात सुरु असलेल्या तब्बल चार महिन्याच्या युद्धाला पूर्ण विराम लागण्याची शक्यता आहे.युद्धबंदीसाठी हमासने इस्रायलला प्रस्ताव पाठवला आहे.हमासकडून बुधवारी पाठवण्यात आलेला प्रस्ताव तीन टप्प्यात असणारा आहे, असे रॉयटर्सने वृत्त दिले आहे.इस्रायलने हमासचा तीन टप्प्यांचा युद्धबंदी प्रस्ताव मान्य केल्यास दोन्ही देशात चालू असलेले युद्ध थांबू शकते.गेल्या आठवड्यात कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांनी प्रस्तावाला उत्तर म्हणून हमासने हा प्रस्ताव पाठवला आहे.
हमासच्या तीन टप्प्यांच्या प्रस्तावानुसार, पहिल्या टप्प्यामध्ये ४५ दिवसांच्या दरम्यान इस्रायलच्या तुरुंगात बंदी असलेल्या सर्व पॅलेस्टिनी मुले आणि महिला यांची सुटका करण्यात यावी, त्याबदल्यात हमासकडून बंदी बनवण्यात आलेल्या सर्व महिला, १९ वर्षाखालील मुले आणि वृद्ध, आजारी नागरिक यांची सुटका करेल.
हेही वाचा..
शिकागोमध्ये हल्ला झालेल्या भारतातील विद्यार्थ्याकडून मदतीची हाक
जेम्स प्रिन्सेप यांचे लिखाण आणि नकाशे ज्ञानवापी प्रकरणात महत्त्वाचे पुरावे!
पाकिस्तान: बलुचिस्तानमध्ये दोन ठिकाणी स्फोट, २२ ठार!
इंग्रजांचा प्रभाव असलेली काँग्रेस आऊटडेटेड
दुसऱ्या टप्प्यात ओलीस ठेवण्यात आलेल्या सर्व पुरुषांची सुटका केली जाईल.शेवटच्या तिसऱ्या टप्प्यात दोन्हीबाजूंकडून युद्धात मारल्या गेलेल्यांच्या अवशेषांची देवाणघेवाण केली जाईल.प्रस्तावानुसार, युध्दविरामाच्या तिसऱ्या टप्प्यात शेवटी दोन्हीबाजूकडून युद्धसमाप्ती करारावर सही करतील, अशी आशा हमासने व्यक्त केली आहे.
हमासने प्रस्तावात म्हटले आहे की, त्यांना १५०० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करायची आहे.या कैद्यांमध्ये जन्मठेप झालेल्या इस्रायलच्या यादीतुन निवडून एक तृतीयांश कैद्यांची सुटका करायची आहे.युद्धबंदीमुळे गाझा पट्टीत अन्न आणि इतर सेवा पोहचवण्यात गती येईल, असे प्रस्तावात म्हटले आहे.हमासच्या युद्धविराम प्रस्तावावर इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.दरम्यान, गाझामधील युद्धबंदीच्या मुद्यावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन इस्रायली नेत्यांशी चर्चा करत आहेत.