इस्रायलने हल्ल्याची तीव्रता वाढवल्याने हमास आता हतबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हमासकडून आता प्रस्ताव आला आहे. त्यांनी पाच दिवसांच्या युद्धविरामाची मागणी केली असून त्यासाठी त्यांनी ७० ओलिसांची सुटका करण्याची तयारी दर्शवली आहे.
सद्यस्थितीत गाझा पट्टीतील सर्वांत मोठे रुग्णालय असणाऱ्या अल शिफा रुग्णालयाला इस्रायली सैनिकांनी वेढा घातला आहे. हल्ल्यांची तीव्रता वाढल्याने हजारो लोकांनी आपले आप्त आणि मुलांना तेथेच सोडून पलायन केले आहे. त्यामुळे शेकडो रुग्ण, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी रुग्णालयातच अडकले आहेत, असे पॅलिस्टाइनच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. हे रुग्णालय आता कार्यरत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. सध्या एका ब्रिटिश स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने शिफा रुग्णालयातील नवजात बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. अल कुदूस हे रुग्णालयही रविवारी इंधनाअभावी बंद करण्यात आले. तेथून सहा हजार रुग्णांना हलवण्याची तयारी सुरू आहे, असे पॅलिस्टिनी रेड केसेट या संस्थेने म्हटले आहे.
हे ही वाचा:
रस्ता अडवणाऱ्या दोघांनी हॉर्न वाजवणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्याला केली जबर मारहाण
‘मोदी म्हणजे रॉकेट, अन् उद्धव ठाकरे फुसकाबार!
अमेरिकेमध्ये पॅलिस्टिनी समर्थक विद्यार्थ्याकडून वर्गामध्ये अडथळा!
कर्नाटकमध्ये तीन मुलांसह मातेची भोसकून हत्या
या पार्श्वभूमीवर हमासने इस्रायलमधून अपहरण करून गाझापट्टीमध्ये आणलेल्या इस्रायली नगारिकांपैकी ७० महिला आणि मुलांची मुक्तता करण्याचा प्रस्ताव इस्रायलसमोर ठेवला आहे. त्या बदल्यात त्यांना पाच दिवसांची युद्धविराम हवा आहे. या दरम्यान संपूर्ण गाझामध्ये मदतीचा पुरवठा करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे, असे दहशतवादी संघटना असणाऱ्या अल-कासम ब्रिगेडने एका वृत्तपत्राला सांगितले. इस्रायलने किमान १०० इस्रायली नागरिकांची मुक्तता करण्याबाबत विचारले होते. आम्ही पाच दिवसांच्या युद्धविरामाच्या बदल्यात त्यांची ५० माणसे किंवा जास्तीत जास्त ७० माणसांची सुटका करू शकतो, असे या दहशतवादी संघटनेच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
१६ वर्षानंतर हमासने गाझावरील नियंत्रण गमावले
‘हमासने गाझा पट्टीवर तब्बल १६ वर्षे सत्ता केली. इतक्या वर्षांत पहिल्यांदाच हमासने गाझावरील नियंत्रण गमावले आहे. दहशतवादी दक्षिणेच्या दिशेने पलायन करत आहेत. सर्वसामान्य नागरिक हमासचे तळ उद्ध्वस्त करत आहेत. त्यांना आता त्यांच्या सरकारवर विश्वास उरलेला नाही,’असे इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलंट यांनी सोमवारी स्पष्ट केले.