हमास नेता याह्या सिनवार आता इस्रायलच्या निशाण्यावर

इस्रायलच्या लष्कराच्या गुप्तचर विभागाकडून दिला इशारा

हमास नेता याह्या सिनवार आता इस्रायलच्या निशाण्यावर

७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत सुरू केलेली कारवाई तीव्र आहे. हमासचा जोपर्यंत खात्मा होत नाही, तोपर्यंत ते शांत बसणार नाहीत, यावर इस्रायल ठाम आहे. हमासच्या सैनिकांना नेस्तनाबूत करण्यासाठी इस्रायलच्या लढाऊ विमानांनी अनेक क्षेपणास्त्रे गाझापट्टीवर डागली. आता हमासचे नेते याह्या सिनवार त्यांचे लक्ष्य आहेत.

याह्या सिनवार यानेच ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याचा कट रचला होता. त्याने हिरवा कंदील दाखवल्यानंतर हमासची शाखा अल कासिम ब्रिगेडचे प्रमुख मोहम्मद डेफ याने ज्यूंच्या पवित्र दिनी सिम्हात तोराह या दिवशी हल्ला केला होता. ‘सिनवार याने तेल अविवला मूर्ख बनवले. इस्रायलने सरकारची अशी धारणा केली की, हल्ले न करता हमास गाझामध्ये स्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, सिनवार आता इस्रायलचे प्रमुख लक्ष्य आहे,’ अशी माहिती इस्रायलच्या लष्कराच्या गुप्तचर संस्थेचे पॅलिस्टिनी विभागाचे माजी प्रमुख आणि देशाचे सैन्य विशेषज्ञ मायकल मिलस्टिन यांनी दिली.

हे ही वाचा:

आयसीसीकडून बंदी; ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू मॅकगेहे यांची निवृत्ती!

फुप्फुसे घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात, तरीही चेन्नईत प्रत्यारोपण

दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी सहकारी आणि खासगी दुध संघांनी पुढाकार घ्यावा

धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

 

हमासच्या मुख्य नेत्यांपैकी एक असलेला सिनवार गाझामध्ये भूमिगत बंकरमध्ये लपला असल्याचा दावाही इस्रायल लष्कराने केला आहे. हमासचा संपूर्ण नायनाट होत नाही, तोपर्यंत गाझामधील मोहीम थांबणार नसल्याचा पुनरुच्चार इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी केला आहे. गाझामधील भुयारी मार्ग, बंकरवरील लष्करी मोहिमांबाबत इस्रायलनेही हमासला इशारा दिला आहे.

 

हमास आणि इस्रायलमध्ये गेल्या महिनाभरापासून संघर्ष सुरू आहे. यात आतापर्यंत १३ हजार ५०० पॅलिस्टिनी नागरिक मारले गेले आहेत. यात साडेपाच हजारांहून अधिक मुलांचा समावेश आहे.

Exit mobile version