हमास या दहशवादी संघटनेने इस्रायलवर असा अचानक हल्ला का केला, याचे अनेक कंगोरे समोर येत आहेत. त्यातच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायल आणि सौदी अरेबियातील संबंध विस्कळीत करण्याच्या उद्देशानेच हमासने हल्ला केल्याचा दावा केला आहे.
सप्टेंबरमध्ये नवी दिल्लीत झालेल्या जी २० शिखर परिषदेत जागतिक स्तरावर इस्रायल आणि सौदी अरेबिया यांनी एकत्र येण्याची हाक देण्यात आली होती. या प्रयत्नांना जी २० येथील शिखर परिषदेत यशही आले. त्यामुळे इस्रायल आणि सौदी अरेबिया या दोन राष्ट्रांमधील संबंध सामान्य पातळीवर येत असतानाच, हमासने हा हल्ला केला, असा दावा बायडेन यांनी केला आहे.
‘हमासला माहीत होते की, मी इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यात चांगले संबंध निर्माण व्हावेत, यासाठी प्रयत्न करतो आहे. हे रोखण्यासाठीच हमासने इस्रायलवर हल्ला केला,’ असे जो बायडेन यांनी शुक्रवारी सांगितले. इस्रायल आणि सौदी अरेबिया हे देश एकमेकांच्या जवळ येत होते. त्यांच्यात चांगले राजनैतिक आणि व्यापारी संबंध जुळवण्याची तयारी सुरू झाली होती. बायडेन यांनी सप्टेंबरमध्ये भारतात झालेल्या जी २० शिखर परिषदेत शिपिंग कॉरिडॉर योजनेची घोषणा केली होती. या ऐतिहासिक कॉरिडॉरमध्ये सहभागी होण्याची तयारी इस्रायल आणि सौदी अरेबियाने दर्शवली होती. बायडेन यांनी दोन्ही देशांना या कॉरिडॉरसाठी एकत्र आणण्याकरिता मदत केली.
हे ही वाचा:
राजनैतिक अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईनंतर ट्रुडो पुन्हा बरळले
फडणवीसांनी बुरखा नव्हे; कपडेच फाडले!
४३ वर्षांनी बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या
चंद्रकात पाटील म्हणाले, माझ्या बॅगेत ८ शर्ट!
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर बायडेन यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी बायडेन यांच्या नेतृत्वाखाली इस्रायल आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक शांतता प्रस्थापित करू शकतो, असा आशावाद व्यक्त केला होता.