हाफिज सईद पाकिस्तानच्या तुरुंगातला कैदी; भोगतोय ७८ वर्षांची शिक्षा

अनेक दहशतवादी हल्ल्याप्रकरणातील आरोपी म्हणून भारतीय तपास संस्थेला सईद हवा

हाफिज सईद पाकिस्तानच्या तुरुंगातला कैदी; भोगतोय ७८ वर्षांची शिक्षा

मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि प्रतिबंधित जमात-उद-दावा संघटनेचा प्रमुख हाफिज सईद पाकिस्तानच्या ताब्यात आहे. दहशतवाद्यांना आर्थिक निधी पुरवल्याप्रकरणी दोषी ठरल्यानंतर तो तेथे ७८ वर्षांची शिक्षा भोगत असल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने त्यांच्या सुधारित अहवालात दिली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भारताने पाकिस्तानकडे संयुक्त राष्ट्राद्वारे सईदच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. तो अनेक दहशतवादी हल्ल्याप्रकरणातील आरोपी म्हणून भारतीय तपास संस्थेला हवा आहे.

हाफिज सईदला डिसेंबर, २००८मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल-कायदा प्रतिबंध समितीने जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केले होते. सध्या तो पाकिस्तान सरकारच्या ताब्यात असून १२ फेब्रुवारी, २०२०पासून ७८ वर्षांची शिक्षा भोगत आहे.

हे ही वाचा:

अखिलेश यांचा अजब दावा, राम बोलावतील तेव्हाच सोहळ्याला जाईन!

राहुल गांधींच्या न्याय यात्रेला सुरुवात होण्याआधीच मणिपूर सरकारचा मैदान देण्यास नकार!

मुइज्जू सरकारने लवकर भारताची माफी मागावी!

बांग्लादेश चीनच्या कह्यात जाणार नाही!

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषद समितीने नुकतीच संपत्ती जप्त करण्यात आलेल्या, प्रवासावर निर्बंध असलेल्या आणि शस्त्रास्त्रांची बंदी असलेल्या व्यक्ती आणि संस्थांची यादी जाहीर केली आहे. समितीने लश्कर-ए-तैयबा (एलईटी)चे संस्थापक सदस्य आणि सईदचा सहकारी हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

सन २००८मधील मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी हल्लेखोरांना प्रशिक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भुट्टावी याचा गेल्या वर्षी मे महिन्यात तुरुंगातच मृत्यू झाला होता. तोदेखील दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत पोहोचवण्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून तुरुंगात शिक्षा भोगत होता.

Exit mobile version