पाकिस्तानमध्ये घरबसल्या मिळते AK- 47

पाकिस्तानमध्ये घरबसल्या मिळते AK- 47

पाकिस्तानमध्ये कोणत्याही व्यक्तीला शस्त्र विकत घ्यायचे असल्यास त्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. कोणतीही व्यक्ती सोशल मीडियावर आपल्या पसंतीचे शस्त्र निवडू शकते, डीलरशी फोनवरून संपर्क करू शकते, किंमतीवर सहमती दर्शवू शकते आणि त्यानंतर कुरिअरच्या माध्यमातून ते शस्त्र त्या व्यक्तीपर्यंत पोहचले जाते. यासंबंधीचे वृत्त ‘साम टीव्ही’ने दिले आहे.

संपूर्ण पाकिस्तानमध्ये अशी सेवा उपलब्ध असल्याचेसमोर आले आहे. विशेष म्हणजे ही सर्व सेवा गुप्त स्वरूपात सुरू नसून शास्त्रांचे कॅटलॉग पाहण्यासाठी फेसबुक पेज आणि व्हॉट्सऍप ग्रुप्स आहेत. शस्त्रे विकत घेणाऱ्या एका पाक नागरिकानेच ही बातमी दिली आहे. त्याची शस्त्रे खैबर पख्तूनख्वामधील दारा आदमखेल येथून कराचीला पाठवण्यात आली होती. त्याची किंमत ३८ हजार रुपये इतकी होती. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना मागितला गेला नाही. हा संपूर्ण व्यवहार फोनवर झाल्याचे त्याने सांगितले. “मी १० हजार रुपये ऍडव्हान्स म्हणून Easy Paisa द्वारे पाठवले आणि उर्वरित २८ हजार रुपये शस्त्र तपासल्यानंतर दिले,” असे त्या व्यक्तीने सांगितले.

हे ही वाचा:

समाजसेवक आणि साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन

प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी यांचा पद्मश्री स्वीकारण्यास नकार

आता कारने उडत उडत प्रवास करता येणार!

राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे

सर्वात स्वस्त शस्त्रे ही कराचीमध्ये मिळतात. दोन स्वतंत्र गट काम करत आहेत. शस्त्रे पुरवठा करणारे आणि शस्त्रे वितरित करणारे अशा गटांमधून हे काम केले जाते. तसेच 9 MM पिस्तुल ते अगदी AK- 47 पर्यंत सर्व प्रकारची शस्त्रे ऑनलाईन विकली जातात.

Exit mobile version