जीएसकेची भारत बायोटेकसोबत हातमिळवणी

जीएसकेची भारत बायोटेकसोबत हातमिळवणी

ब्रिटनच्या जीएसके कंपनीने भारताची कोविड-१९ ची लस बनवणारी कंपनी भारत बायोटेक सोबत मलेरियाची लस बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मलेरिया या प्राणघातक आजाराशी लढा देण्याच्या जागतिक प्रयत्नांचा भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या करारान्वये जीएसके मलेरियाच्या लसीचा भाग असलेले प्रथिन उत्पादनाचे तंत्रज्ञान हस्तांतरण करणार आहे. मलेरियावर उतारा म्हणून आरटीएस,एस/एस०१ ही लस वापरली जाते जीएसके या नंतरही भारत बायोटेकला व्हॅक्सिन बूस्टरचा पूरवठा करत राहणार आहे.

जीएसके आणि एक ना फायदा तत्त्वावर काम करणारी पीएटीएच ही संस्था २००१ पासून तयार करत असलेली केलेली मलेरियावरची लस घाना, केनिया आणि मालावी या देशांमध्ये वापरली जाते.

मलेरिया हा माणसांमध्ये विशिष्ट जातीच्या डासाच्या मादीपासून पसरणारा आजार आहे.

दूरगामी परिणाम साधण्यासाठी भारत बायोटेक सारख्या औषध उत्पादनातील अग्रणी कंपनी सोबत काम करणे हे या घातक आजारवर मात करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. या प्राणघातक आजारावर मात करेपर्यंत हे कायम राहिल.

जगभरात २०१९ मध्ये या आजाराच्या २२९ मिलियन घटना समोर आल्या होत्या. जागतिक आरोग्य संघटनेनुसार मलेरियाने होणाऱ्या मृत्यूंपैकी ९४ टक्के मृत्यू आफ्रिकेत होतात.

Exit mobile version