इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी इस्रायलने जोरदार हल्ला चढवत हिजबुल्लाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्लाला ठार केले होते. नसरल्लाच्या मृत्यूनंतर दोन्ही बाजूंनी हल्ले सुरु आहेत. मात्र, सध्याच्या बातम्यांवर विश्वास ठेवला तर हल्ल्यांमध्ये इस्रायल अग्रेसर ठरत आहे. त्यामुळे सध्या अशी बातमी समोर येत आहे की, इस्रायलच्या हल्ल्यांच्या भीतीने बेरूतचे रहिवासी घर सोडून कारमध्ये झोपत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वाढत्या हल्ल्यामुळे शहरातील अनेक लोक घरे सोडून पळ काढत आहेत. रस्त्यांवर, चौकांमध्ये, समुद्राकिनाऱ्यावर देखील अनेक लोक आश्रय घेत आहेत. दक्षिणेकडील उपनगरे, सामान्यतः दहियाह आणि देशाच्या इतर भागांतून पळून जाणाऱ्या लोकांच्या पार्क केलेल्या कारने शहराचे रस्ते भरले आहेत. कुठेही जाण्याची सोय नसल्याने अनेक कुटुंबे त्यांच्या गाड्यांमध्ये झोपली आहेत. पळून जाणाऱ्या अनेकांनी सध्याच्या परिस्थितीवरून दुःख व्यक्त केले. मात्र, स्वतःसाठी आणि परिवारासाठी बाहेर कुठेतरी जावेच लागेल असे लोकांनी सांगितले.
हे ही वाचा :
भारतीयांनी इराणचा अनावश्यक प्रवास टाळावा !
डेन्मार्कमध्ये इस्रायली दूतावासाजवळ दोन स्फोट
‘स्वच्छ भारत मिशन’च्या दशकपूर्तीला मोदींनी लोकसहभागाची घेतली दखल!
इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करून चूक केलीये, आता परिणाम भोगा
दरम्यान, इस्त्रायलीने अनेक दक्षिणेकडील लेबनीज शहरांतील रहिवाशांना त्यांची घरे सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच इस्रायल आणि हिजबुल्लाच्या युद्धात भाग घेवून इस्रायलशी पंगा घेतला आहे. इराण काल इस्रायलवर सुमारे १८० हून अधिक क्षेपणास्त्रे हल्ले चढवले. इराणने इस्रायलवर रॉकेट्स डागल्यानंतर इस्रायलने त्यांना गंभीर इशारा दिला आहे. इराणने आमच्यावर हल्ला करून फार मोठी चूक केली आहे. त्यांना याची भरपाई करावी लागेल, असे इस्रायलने म्हटले आहे.