29 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
घरदेश दुनियागाझामध्ये लवकरच जमिनीवरील लढाई; हमासचा उच्च नौदल अधिकारी ठार

गाझामध्ये लवकरच जमिनीवरील लढाई; हमासचा उच्च नौदल अधिकारी ठार

Google News Follow

Related

हमासशासित गाझा पट्टीमध्ये आता कधीही जमिनीवरील लढाईचे रणशिंग फुंकले जाऊ शकते. तसे आदेश कधीही मिळणार असल्याने इस्रायलचे सुरक्षा दल गाझा पट्टीमध्ये घुसण्यासाठी सज्ज झाले आहे. त्याच दरम्यान हमासच्या विशेष नौदलाचा मोठा अधिकारी इस्रायली लष्कर आणि नौदलाच्या संयुक्त मोहिमेत मारला गेला आहे.

‘तुम्ही आता गाझाला दुरून पाहात आहात. लवकरच तुम्ही ते आतून बघाल. तसे आदेश लवकरच तुम्हाला मिळतील,’ असे वक्तव्य इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलंट यांनी सुरक्षा दलाला संबोधताना केले आहे. इस्रायल आणि हमासमधील या युद्धाने आता १४व्या दिवसात प्रवेश केला आहे. इस्रायल सुरक्षा दलाच्या मते हे युद्ध दीर्घकाळ चालण्याची शक्यता असून ते खडतर असू शकते. मात्र तरीही इस्रायल हमासवर विजय मिळवेलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी गाझा सीमेनजीकच्या गोलानी येथील काही सैनिकांची भेट घेतली आणि त्यांचे मनोबल वाढवले. तसेच, इस्रायल सर्व शक्तिनिशी जिंकेल, असा आशावादही व्यक्त केला. ‘संपूर्ण इस्रायल तुमच्या पाठिशी आहेत. आपण सर्व ताकद पणाला लावून शत्रूवर हल्ला करणार आहोत, म्हणजे आपला विजय निश्चित होईल, असे नेतान्याहू म्हणाले. तर, इस्रायल सुरक्षा दलाच्या दक्षिण कमांडचे मेजर जनरल यारोन फिंकेलमन यांनीही जमिनीवरील लढाई दीर्घकाळ चालणारी आणि तीव्र असेल, असे म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘महुआ यांनी लॉग-इन, पासवर्ड शेअर केले, मोदींची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न’

ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या वाहनचालकाला अटक

बारामतीत विमान कोसळलं, पायलट जखमी!

‘वीर सावरकर, सिक्रेट फाईल्स’ या वेबसिरीजमधून सावरकरांचा जीवनपट उलगडणार

त्याचवेळी आयडीएफ आणि नौदलाने संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेत हमासच्या नौदलाचा प्रमुख अधिकारी मबदुह शालाबी मारला गेला आहे. तो इस्रायलवर केल्या जाणाऱ्या समुद्री हल्ल्यामध्ये सहभागी होता. कमांड सेंटरमधून सूत्रे हलवत असताना शालाबीला लक्ष्य करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
176,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा