इंग्लंडमधील रॉदरहॅममधील एका मुलीवर १३ ते १५ वर्षांच्या वयात बलात्कार झाला होता आणि तिला विश्वास होता तिची आई याचा पुढील बळी असणार आहे. १५ वर्षांच्या मुलीला नेहमीच सांगितले गेले की, तिचा मृत्यू केवळ एका बंदूक गोळीपासून दूर आहे. तर, कधी हातोड्याने मारहाण केली गेली आणि कधी क्रूरपणे बलात्कार करून तिला गप्प केले गेले. ब्रिटनमधील अनेक मुलींची तरुण मुस्लिम पुरुषांशी मैत्री होती आणि नंतर त्यांची रवानगी वयस्कर पुरुषांकडे केली गेली. त्यानंतर सामूहिक बलात्कार आणि इतर अनेक प्रकारची हिंसा झाली. ९० च्या दशकापासून ब्रिटनमध्ये कार्यरत असलेल्या ग्रूमिंग गँगच्या या कथा संताप आणणाऱ्या आहेत.
टेस्लाचे सर्वेसर्वा एलोन मस्क यांनी ब्रिटनचे पंतप्रधान, केयर स्टार्मर यांना ग्रूमिंग गँगच्या विरोधात कारवाई न केल्याबद्दल लक्ष्य केले. त्यांनी केलेल्या टीकेमुळे ग्रूमिंग गँग आणि त्यांच्या कारवाया समोर आल्या असून त्या हेडलाईन बनल्या आहेत. या ग्रूमिंग गँगची काम करण्याची एक पद्धत आहे. रॉदरहॅम, ओल्डहॅम आणि इतर भागातील १० वर्षांच्या लहान मुलींना पाकिस्तानी वंशाच्या पुरुषांनी आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना मोठ्या पुरुषांकडे नेले जे त्यांच्यावर नियंत्रण ठेवतील आणि त्यांना हाताळतील. या अल्पवयीन मुलींवर हे पुरुष आणि त्यांचे नातेवाईक, मित्र वर्षानुवर्षे सामूहिक बलात्कार करत असत. जेव्हा या महिलांनी त्यांच्या गैरवर्तनाची तक्रार केली तेव्हा अधिकाऱ्यांनी देखील कारवाई करणे टाळले कारण त्यांना ब्रिटनमधील सांस्कृतिक संवेदना दुखवायच्या नव्हत्या. पण, यातून बचावलेल्यांची कथा आणि प्रसारमाध्यमांच्या वृत्तांतून प्रामुख्याने पाकिस्तानी पुरुष असलेल्या ग्रूमिंग गँगच्या सदस्यांनी केलेल्या लैंगिक शोषण आणि हिंसाचाराची प्रकरणे उघड केली आहे. आता, लोक या टोळ्यांच्या गुन्ह्यांची खरी व्याप्ती शोधण्यासाठी संपूर्ण ब्रिटनमध्ये चौकशीची मागणी करत आहेत.
हुसैन बंधूंनी अनेक तरुणींना केले लक्ष्य
जेसिका (नाव बदलले आहे), वय १४ वर्षे हिला अर्शिद हुसैन (वय २४ वर्षे) याने प्रथम शिवीगाळ केली. सुरुवातीला हुसैन हा तिच्याशी अतिशय नम्र आणि दयाळूपणे वागत होता, परंतु हळूहळू बदल होत गेला आणि तिच्या नियंत्रण ठेवणे, जबरदस्ती करणे हे सुरू झाले. तिने बीबीसीला सांगितले की, “माझ्या जगातील एकमेव व्यक्ती तो आहे असे वाटू लागले होते. त्याने तिला हे पटवून दिले की तिला मदत करण्याचा प्रयत्न करणारे तिचे कुटुंबीय तिच्या विरोधात होते आणि तिच्या भल्याचा विचार करत होते. पण, तिने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. पुढे, केवळ राग आणि हिंसाचार झाला. अनेकदा असे वाटायचे की, हुसैन तिला कोणत्याही क्षणी मारून टाकेल. जेसिका आणि तिच्यासारख्या अनेक तरुणींनी आशा सोडून दिली होती. हुसैन बंधू म्हणजेच अर्शिद, बन्नरस हुसेन आणि बशारत हुसेन यांच्याकडून बळी पडलेल्या अनेकांना ते आपले काय करू शकतात याची भीती वाटत होती. गार्डियनच्या अहवालानुसार, या हुसैन बंधूनी एका मुलीला कित्येक आठवडे बंदिस्त केले होते आणि तिला बाहेर येण्यासाठी ‘मोबदला’ द्यावा लागला होता. पीडितांवर त्यांनी केलेल्या अत्याचाराचा दीर्घकालीन परिणाम देखील झाला. एका मुलीने फक्त अंधारात कपडे बदलण्यास सुरुवात केली होती कारण तिला तिच्या शरीराचा तिरस्कार होऊ लागला होता. तिला नैराश्याने ग्रासले होते. ही लक्षणे ग्रूमिंग टोळीने केलेल्या अत्याचाराच्या अनेक पीडितांमध्ये दिसून आले आहे.
१०० हून अधिक पुरुषांनी केला अत्याचार
स्काय न्यूजशी बोलताना लुईस (नाव बदलले आहे) या तरुणीने सांगितले की, टेलफोर्डमध्ये १०० हून अधिक पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला. तिने सांगितले की, “तो मला रेस्टॉरंटच्या कोपऱ्यात घेऊन जायचा आणि माझ्याशी लैंगिक संबंध ठेवायचा. बाकीचे रेस्टॉरंट कामगारही संबंध ठेवत असत.” तिने या गुन्ह्यांची तक्रार पोलिसांकडे केली नाही कारण ती तरुण होती आणि स्वतःला, तिच्या कुटुंबावर याच्या होणाऱ्या परिणामांची तिला भीती होती. तिने म्हटले की, तेव्हा मी पोलिसांकडे जाण्याचा विचार केला नाही कारण ते मला धामकवायचे त्यामुळे मी खूप घाबरले होते. त्यांनी धमकी दिली होती की, ते माझे घर उडवून देतील. माझ्या आई वडिलांना मारतील. त्यांनी सांगितले की मी कोणाला सांगितले तर ते माझ्या आईवर बलात्कार करतील.
पीडित तरुणीसह कुटुंबाची केली हत्या
५ ऑगस्ट २००० रोजी, २६ वर्षीय टॅक्सी चालक अझहर अली मेहमूद याने ब्रिटनमधील एक घर जाळले. हे घर १६ वर्षांच्या लुसी लो हिचे होते; जिच्याशी ती १२ वर्षांची असल्यापासून त्याचे नाते होते. दुर्दैव आणि भयंकर गोष्ट म्हणजे या आगीत लुसी, तिचे न जन्मलेले मूल, तिची बहीण सारा आणि तिची आई आयलीन लिंडा यांचा मृत्यू झाला होता. मेहमूद हा त्याच्या प्रिय मुलाला, तसनीमला घेऊन निघून गेला. त्याने लुसीवर अनेक वेळा बलात्कार केला होता. या प्रकरणाच्या चौकशीत असे आढळून आले की अशा अनेक प्रकरणांकडे अधिकाऱ्यांनी कसे दुर्लक्ष केले. लुसी हिची हत्या ही गुन्हेगारांविरुद्ध मदत मागणाऱ्या प्रत्येकासाठी उदाहरण म्हणून दाखवण्यात आली.
देशभरातील पुरुषांकडून १०० हून अधिक वेळा बलात्कार
रुबी हिला (नाव बदलले आहे) खाण्यापिण्यासाठी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. पण, त्यानंतर जे घडले ते भयानक होते. “त्यांनी आम्हाला वोडका आणि सिगारेट दिले. नशा चढताच आम्हाला दुसऱ्या खोलीत नेण्यात आले. तेव्हा ३० ते ४० पुरुष त्यांची वाट पाहत होते. रात्रभर या नराधमांनी एकामागून एक बलात्कार केला,” असं काही मुलींनी बीबीसीशी बोलताना सांगितले. रुबीने सांगितले की, देशभरातील पुरुषांनी तिच्यावर शंभराहून अधिक वेळा बलात्कार केला. वयाच्या १३ व्या वर्षी तिचा गर्भपातही झाला होता. गुन्हेगारांशी जुळण्यासाठी तिचा डीएनए तिला न कळवता घेण्यात आला. वर्षांनंतर, तिच्या एका गुन्हेगाराला आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. पण चार वर्षांनंतर, तिने त्याला एका दुकानात पाहिले आणि शक्य तितक्या लवकर तिच्या घरी धाव घेतली आणि भीतीने स्वतःला कोंडून घेतले.
हे ही वाचा..
आसाम-त्रिपुरामध्ये ८ बांगलादेशी घुसखोरांना अटक, दलालही ताब्यात!
पुडुचेरीत एका मुलाची एचएमपीव्ही चाचणी पॉझिटिव्ह
बीएसएफने बांगलादेशींचा बंगालमधील घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला
पूर्व लडाखमधील एलएसीजवळ चीनकडून सराव
वडिलांनंतर ग्रूमिंग गँगकडून लक्ष्य
स्कार्लेट या ग्रूमिंग गँगमधून वाचलेल्या महिल्या आहेत. स्कार्लेट यांच्या वडिलांनी तिच्या वयाच्या ८ व्या वर्षी तिचे लैंगिक शोषण केले. पुढे काही वर्षांनंतर, सुंदर दात आणि स्वतःची गाडी असलेला एक सुंदर दिसणारा पाकिस्तानी माणूस तिच्या आयुष्यात आला. तो ग्रूमिंग गँगचा सदस्य होता. तिच्या वयाच्या १४ व्या वर्षी त्याच्याकडून तिचा गैरवापर सुरू झाला. त्याने तिला एका रिकाम्या घरात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तिच्यावर बलात्कार झाल्याचेही तिला कळले नाही. नंतरच तिला हा अत्याचार असल्याचे समजले. तिला वाटत राहिले की तो तिच्यावर प्रेम करतो आहे. पण लवकरच तो तिचा लैंगिक छळासाठी वापर करू लागला. पुढे तिला समजले की ती गर्भवती आहे. गर्भपाताचा प्रयत्नही त्याने केला पण, सुदैवाने ते मूल जन्माला आले. त्यानंतर ते भीतीच्या छायेखालीचं राहत होते. तिने त्याची आज्ञा मोडली तर तिला जबरदस्त मारहाण केली जात होती. तो तिला इतर पुरुषांकडेही पाठवू लागला. तिच्यावर अनेकांनी बलात्कार केला.