बंगळूरू विमानतळ मेट्रोमार्गाला केंद्राचा हिरवा कंदिल

बंगळूरू हे भारतातील सिलिकॉन व्हॅली या नावाने ओळखले जाते. या शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक महत्त्वाची वाढ होणार आहे. इतर शहरांशी जोडणाऱ्या विमानतळ आणि शहराला जोडणे हे विकासाठीचे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

बंगळूरू विमानतळ मेट्रोमार्गाला केंद्राचा हिरवा कंदिल

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेल्या माहिती नुसार बंगळूरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते आऊटर रिंग रोड मेट्रो लाईन या ५६ किमीच्या अंतराकरता मेट्रो मार्गाला परवानगी दिली आहे. हा प्रकल्प पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डकडे (पीआयबी) शहरी विभाग मंत्रालयाने मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. येतचेनाहळ्ळी- सिल्क इन्स्टिट्युट या मेट्रो मार्गाच्या व्हिडियो कॉन्फरन्सिन्गद्वारे केलेल्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

बंगळूरू मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक अजय सेठ यांनी माध्यमांना सांगितले की पीआयबी केंद्र सरकारकडे मंजूरीनंतर एक निवेदन सादर करेल. त्यामुळे आम्हाला येत्या दोन-तीन महिन्यांत परवानगी मिळेल अशी आशा आहे.

विमानतळ मार्गाचे दोन टप्पे आहेत- सेंट्रल सिल्क बोर्ड ते के आर पुरम (फेज २अ) आणि के आर पुरम ते केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (फेज २ब) असे टप्पे असतील.

येताचेनाहळ्ळी- सिल्क इन्स्टिट्युट हा नम्मा मेट्रो मार्गाचा दुसरा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्याला २०१४ मध्ये मंजूरी देण्यात आली होती आणि २०१८ पर्यंत तो पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या कामास विलंब झाला. ही मार्गिका सध्या अस्तित्त्वात असलेल्या ग्रीन लाईन मार्गाचा विस्तारित मार्ग आहे.

दक्षिण पश्चिम रेल्वेने केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता रेल्वेसेवा ४ जानेवारी २०२१ पासून चालू केली. या पार्श्वभूमीवर मेट्रो मार्गाला देण्यात आली आहे. एकूण पाच या स्थानकावर थांबतात. २०२३ पर्यंत अजून एक उपनगरी सेवेकरिता विशेष रेल्वे मार्गिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळ ते शहर या दरम्यान वेगवान वाहतूक होऊ शकेल.

Exit mobile version