23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियासिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराला सचिन आणि ब्रायन लाराचे नाव

सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराला सचिन आणि ब्रायन लाराचे नाव

सचिनच्या ५०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिला सन्मान

Google News Follow

Related

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सोमवारी २४ एप्रिलला वाढदिवस. यानिमित्ताने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सचिनचा एका वेगळ्या प्रकारे सन्मान करण्यात आला. सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा यांची नावे गेटला देण्यात आली. याआधी सर डॉन ब्रॅडमन, ऍलन डेव्हिडसन आणि आर्थर मॉरिस यांना हा सन्मान देण्यात आला होता. त्यांच्या पंक्तीत आता सचिन आणि लारा हे विराजमान असतील.

सचिनच्या ५०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सन्मान देण्यात आला आहे. त्याशिवाय, लाराने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर २७७ धावांची जी खेळी १९९३मध्ये केली होती, त्यालाही ३० वर्षे झाली त्यानिमित्ताने हा योग जुळून आला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत म्हटले आहे की, सदस्यांचे पॅव्हेलियन आणि नोबल ब्रॅडमन मेसेंजर स्टँड यांच्या दरम्यान हे प्रवेशद्वार आहे. तिथे हे नाव देण्यात आले आहे. ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर गेट्स असे त्यावर लिहिले आहे.

हे ही वाचा:

गावातील लोकांमध्ये फूट पाडून राजकीय पक्षांनी आपली दुकाने चालवली

नरेंद्र मोदींची लोकप्रियता उद्धव ठाकरेंची पोटदुखी

हिजाबपेक्षा शिक्षणाला महत्व देत कर्नाटकची तबस्सुम शेख पीयूसी परीक्षेत टॉपर

यात्रा कर घेऊनही गणपतीपुळ्यात पर्यटकांना सुविधांच्या नावाने बोंबच .. !

सचिनने या मैदानावर ज्या पाच कसोटी झाल्या त्यापैकी जी तीन शतके ठोकली त्याचा उल्लेख पाटीवर करण्यात आला आहे. सचिनचे हे भारताबाहेरील आवडते मैदान आहे, असाही उल्लेख त्यावर करण्यात आला आहे. लाराच्या ३४ शतकांपैकी २७७ धावांची खेळी सिडनीत केली गेली, त्याचाही उल्लेख इथे करण्यात आला आहे.

त्याशिवाय, दोन्ही महान खेळाडूंचे खेळलेले सामने, धावा, सरासरी, सर्वोच्च खेळी यांचाही उल्लेख तिथे आढळतो.

यासंदर्भात सचिन तेंडुलकरने म्हटले आहे की, सिडनी क्रिकेट मैदान हे माझे परदेशातील आवडते मैदान आहे. माझ्या काही आठवणी या स्टेडियमशी निगडित आहेत. मी १९९१-९२ला इथे पहिल्यांदा दौरा केला. याच मैदानावर माझे आणि माझा परममित्र ब्रायन लाराचे नाव प्रवेशद्वाराला देण्यात आले आहे हा माझा मी सन्मान समजतो.

ब्रायन लारा याबाबत म्हणाला की, मला हा खूप मोठा सन्मान वाटतो. या मैदानाशी अनेक आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. मी जेव्हा ऑस्ट्रेलियात असतो तेव्हा इथे भेट द्यायला मला खूप आवडते.

लाराने सिडनीत ३८४ धावा केल्या आणि चार कसोटीत वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले. त्यात २७७ धावांची त्याची खेळी ही सर्वोच्च होती. सचिनने इथे पाच कसोटीत ७८५ धावा केल्या. त्यातील त्याची तीन शतके होती. २००४मध्ये त्याने २४१ धावांची नाबाद खेळीही समाविष्ट आहे.

याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले म्हणाले की, संपूर्ण क्रिकेटजगत सचिन तेंडुलकरचा ५०वा वाढदिवस साजरा करत असताना आम्हाला त्याच्या आणि ब्रायन लाराच्या नावाने इथे प्रवेशद्वार तयार करता आले हे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय संघ सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या हिरवळीवर पाऊल ठेवतील तेव्हा या दोन्ही महान क्रिकेटपटूंची नावे या प्रवेशद्वाराला दिलेली पाहून त्यांना निश्चित प्रेरणा मिळेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा