“माझ्या आईचे प्राण वाचवल्याबद्दल भारतासाठी कृतज्ञ”

शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाझेद जॉय यांनी व्यक्त केले आभार

“माझ्या आईचे प्राण वाचवल्याबद्दल भारतासाठी कृतज्ञ”

बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिंसाचार उसळलेला असताना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला. यानंतर शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाझेद जॉय यांनी म्हटले होते की, त्या आता कदाचित बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा जाणार नाहीत. यानंतर त्यांनी आणखी एक व्हिडीओ मेसेज पोस्ट करत भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

सजीब वाझेद जॉय यांनी एएनआयशी बोलताना म्हटले आहे की, “माझ्या आईचे प्राण वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने त्वरित कारवाई केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यासाठी मी सदैव कृतज्ञ राहीन. माझा दुसरा संदेश भारतासाठी असा आहे की, भारताने जगात नेतृत्वाची भूमिका घेणे आवश्यक आहे. इतर परकीय शक्तींना परिस्थितीवर हुकूम करू देऊ नये. कारण बांगलादेश हा भारताचा शेजारी आहे. ही भारताची पूर्व बाजू आहे,” असा सल्ला देत त्यांनी भारताचे आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

हे ही वाचा :

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड

इस्रायलकडून गाझामधील शाळेवर हवाई हल्ला; १०० हून अधिक लोक ठार

ब्राझीलमध्ये ६२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले; सर्व प्रवाशांसह क्रू मेम्बर्स दगावले

ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कुस्तीची परंपरा कायम; अमन सेहरावतने जिंकले कांस्यपदक

सजीब वाझेद जॉय पुढे असेही म्हणाले की, “शेख हसीना यांच्या सरकारने बांगलादेशात शांतता राखली, आर्थिक वाढ केली, बंडखोरी थांबवली आणि आपल्या उपखंडाचा पूर्व भाग स्थीर ठेवला. हे कोणीही नाकारू शकत नाही. याचे ट्रॅक रेकॉर्डही आहेत. आमचं एकमेव सरकार आहे, ज्यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. इतर सरकारांनी अनेक प्रयत्न केले. परंतु ते अयशस्वी झाले,” असं शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाझेद जॉय म्हणाले.

उद्धव ठाकरे आले' पहिल्या' नंबरवरून तिसऱ्या नंबरवर ! | Mahesh Vichare | Uddhav Thackeray | Rahul G |

Exit mobile version