राहुलजी, ही टोपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नव्हे!

राहुलजी, ही टोपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नव्हे!

भगतसिंह कोश्यारी यांनी दिली कोपरखळी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या काळ्या टोपीवरून राहुल गांधी यांचीच टोपी उडविली आहे.

कोश्यारी म्हणाले की, राहुल गांधी यांना असे वाटते की, मी परिधान करतो ती टोपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित आहे. तसेच हिंदुत्ववादी विचारवंत स्वातंत्र्यवीर सावरकर हे संघाचे होते असे त्यांना वाटते. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री यांनी त्यांच्या ‘भारतीय संसद में भगत सिंह कोश्यारी’ या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान हे उद्गार काढले.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीमध्ये हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. राहुल गांध यांनी तुम्ही काळी टोपी का घालता असा प्रश्न त्यांना विचारला होता असेही ते यावेळी म्हणाले. त्यावर उत्तरादाखल ही उत्तराखंडची पारंपरिक टोपी असल्याचे म्हटले होते असेही ते म्हणाले. संघाचा उदय होण्याआधीपासून ही अशी टोपी उत्तराखंडमध्ये वापरण्याची प्रथा आहे, असेही त्यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिले होते.

कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया, दिल्ली येथे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अश्विनी कुमार चौबे, कोश्यारी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्याम जाजू यावेळी उपस्थित होते. याचिका समितीचे अध्यक्ष म्हणून कोश्यारी यांनी घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचे अहवालही या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत. कोश्यारी यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाची छायाचित्रेही ४५० पानांच्या या पुस्तकात संकलित करण्यात आली आहेत. हे पुस्तक चार विभागात विभागलेले आहे.

हे ही वाचा:

मोनिकाच्या हाताच्या स्पर्शातून त्यांना जाणवले मुलाचे अस्तित्व

माझ्या पप्पांचा पगार द्या! वेतन नसलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीची आर्त हाक

अनिल देशमुखांना क्लिन चीट दिलेलीच नाही!

काबुल विमानतळावर पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला

कोश्यारी यांच्या भाषणापूर्वी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अधिवेशनात विरोधकांच्या वृत्तीवर टीका केली. त्यांनी संसदेत खासदार म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या प्रामाणिक आणि सन्माननीय भूमिकेचे कौतुक केले.

Exit mobile version