भारतीय-अमेरिकन व्यापार आणि उद्योग श्रेणीमध्ये भारतीय वंशाचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना २०२२ साठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय राजदूत तरनजीत एस संधू यांच्या हस्ते पिचाई यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारने सुंदर पिचाई यांना पद्म पुरस्कार घोषित केला होता. त्यानंतर पिचाई यांना शुक्रवारी सॅन फ्रान्सिस्को येथे त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत एस. संधू यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, सुदंर पिचाई यांचा दुराई ते माउंटन व्ह्यू हा असा प्रेरणादायी प्रवास आहे. यामुळे भारत-अमेरिका आर्थिक आणि तंत्रज्ञानातील संबंधांना बळकटी मिळणार आहे.
तसेच सुदंर पिचाई यांनी सुद्धा यावेळी भारत सरकारचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, सर्वोच्च पुरस्काराबद्दल मी भारत सरकार आणि भारतीय जनतेचा आभारी आहे. भारत हा माझाच एक भाग आहे. तंत्रज्ञानाचा लाभासाठी आम्ही एकत्र काम करत असताना गुगल आणि भारत यांच्यातील भागीदारी अशीच सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे. भारत हा माझाच एक भाग आहे आणि मी जिथे जिथे जातो तिथे तो माझ्यासोबत घेऊन जातो, असे पिचाई यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
अजितदादांनी काढली ठाकरेंच्या बातचलाखीची हवा…
जेवणातून ‘आर्सेनिक’ आणि ‘थेलीयम’ देत घेतला नवरा, सासूचा जीव
दरम्यान, यावर्षी २५ जानेवारी रोजी सुंदर पिचाई यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनाही याच क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण देण्याची घोषणा करण्यात आली होती.