सोन्याला ‘अच्छे दिन’ येणार

सोन्याला ‘अच्छे दिन’ येणार

सोन्याच्या दरात विविध कारणांमुळे सध्या घट होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जूनच्या मध्यापासून ते आतापर्यंत सोन्याचे दर जवळपास अडीच टक्क्यांनी उतरले आहेत. परंतु ही घसरण तात्पुरती असून लवकरच सोन्याचे दर वाढतील, असा विश्वास या क्षेत्रातील जाणकार आणि व्यावसायिक करत आहेत. काही महिन्यांपूर्वी ५५ हजार रुपये प्रति तोळा एवढे सोन्याचे दर होते. मधल्या काळात हे दर ४३ ते ४४ हजारांवर घसरले होते. सध्या सोन्याचे दर ४५ ते ४६ हजारांवर पोहचले आहेत. त्यामुळे लवकरच सोन्याला चांगले दिवस येतील, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे.

अमेरिकी डॉलर सध्या बाजारात मजबूत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत कमी झाली आहे. त्यामुळेच भारतातही सोन्याचे दर कमी झाले आहेत. दिवाळीपर्यंत सोन्याचे दर पुन्हा वाढतील, असे ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष आशीष पेठे यांनी सांगितले. चांदीच्या दरातही चढउतार येत असतात. भविष्यात चांदीच्या दरातही वाढ होईलच असेही पेठे यांनी सांगितले. किलोमागे ७३ हजारांवर गेलेली चांदी सध्या ६३ हजारांवर आहे.

हे ही वाचा:

उपग्रह प्रक्षेपणात इस्रोला आले अपयश

चालुक्य कालीन मंदिरात झाली चोरी!

राज्यात पुन्हा बरसणार जलधारा

लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित

जगभरातील कोरोना संकट, विकासाची अनिश्चितता, मेरीकेतील बॉंडचे घटते उत्पन्न, कमी होणारी बेकारी व त्यामुळे कोरोना काळातील पॅकेज मागे घेण्याची अमेरिकन फेडची धोरणे, अशी कारणे सोन्याच्या दरातील घसरणीमागे होती. हाच कल अजून काही आठवडे राहील अशी माहिती अँजेल ब्रोकिंग लि. चे उपाध्यक्ष प्रथमेश मल्ल्या यांनी सांगितली. सोन्यासारखा मौल्यवान धातू प्रत्येक पडझडीच्या वेळी थोड्या प्रमाणात खरेदी करायला हवा. यापूर्वीच्या सोन्याच्या तेजीत अनेक गुंतवणूकदारांची सोनायात नफा कमावण्याची संधी हुकली. त्यांच्यासाठी आताची घसरण ही संधी आहे. काही महिन्यात सोन्याचे दर ४७ हजारांच्या वर जाण्याची शक्यता आहे, असेही मल्ल्या म्हणाले.

Exit mobile version