आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख गीता गोपिनाथ यांनी भारताच्या कोविड-१९च्या विरुद्धच्या लढ्यातील लसीकरणाच्या मोहिमेचे कौतूक केले आहे. भारताची मोहिम वाखाणण्याजोगी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डॉ. हंसा मेहता व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना गीता गोपिनाथ यांना भारताशी निगडीत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी हे उद्गार काढले होते. यावेळी गोपिनाथ यांनी जगाच्या कोविड विरूद्धच्या लढ्यातील भारताच्या महत्त्वपूर्ण योगदानाची प्रशंसा केली. त्याचबरोबर भारत मोठ्या प्रमाणात लशींच्या उत्पादन आणि पुरवठा करून अनेक देशांना सहाय्य करत असल्याचे देखील त्यांनी उल्लेखून सांगितले.
यावेळी त्यांनी पुणे येथील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे देखील आभार मानले. त्या म्हणाल्या, सामान्य काळात बऱ्याच लशींची निर्मीती सिरम इन्स्टिट्युट कडून केली जाते. आता कोविड काळात सिरम मोठ्या प्रमाणात कोविड-१९ वरील लसींचे उत्पादन देखील करत आहे. लसीचे उत्पादन करून कोवॅक्सकडे देऊन नंतर जगभरात पोहोचवण्यासाठी सिरमचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या व्हर्च्युअल व्याख्यानाचे आयोजन भारताचे संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधी आणि द युनायटेड नेशन्स ऍकॅडमिक इम्पॅक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. समाजसुधारणा आणि शैक्षणिक क्षेत्रांत भरीव काम करणाऱ्या डॉ. मेहता यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.