अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ आयएमएफच्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर पदी  

अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ आयएमएफच्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर पदी  

इंटरनॅशनल मॉनेटरी फंड म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (आयएमएफ) फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर या पदी भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांची निवड करण्यात आली आहे. जियोफ्रे ओकामोटो या पुढील वर्षी या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या जागी गीता गोपीनाथ २१ जानेवारी पासून फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. सध्या गीता गोपीनाथ मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम पाहत आहेत.

गीता गोपीनाथ यांचा जन्म भारतात झाला असून त्या अमेरिकेच्या नागरिक आहेत. गीता गोपीनाथ यांचे संशोधन लेख विविध इकॉनॉमिक्स जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. आयएमएफमध्ये मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम करण्याअगोदर गीता गोपीनाथ या हॉवर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील आंतरराष्ट्रीय स्टडीज अँड इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. ऑक्टोबर २०१८ मध्ये गीता गोपीनाथ यांची चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून आयएमएफमध्ये निवड झाली होती.

हे ही वाचा:

ओमिक्रोन झालेल्या रुग्णांच्या संपर्कातले आणखी पाच जण पॉझिटीव्ह

वानखेडेवर पडणार धावांचा पाऊस की वारुणराज फिरवणार सामन्यावर पाणी ?

शेवडे यांनी मांडलेली विषवल्ली शहरात आहे, त्याचा मुकाबला करावा लागेल

मिर्झापूरच्या ललितचा मृतदेह आढळला

गुरुवारी आयएमएफकडून ओकामोटो जानेवारीमध्ये त्यांच्या पदावरुन राजीनामा देणार असून आयएमफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ या त्यांच्या पदावर काम पाहतील, अशी घोषणा करण्यात आली. आयएमएफने गीता गोपीनाथ यांनी त्यांच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून असलेल्या कार्यकाळात महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे सांगीतले आहे.

गीता गोपीनाथ यांनी त्यांच्या आयएमएफच्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर पदावरील निवडीबाबत आनंद व्यक्त केला आहे. महामारीच्या काळात आयएमफने केलेले काम अतिशय महत्त्वाचे आहे. महत्त्वाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे गीता गोपीनाथ यांनी ट्विट करून म्हटले आहे.

Exit mobile version