तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून पळाले आहेत. घनी यांनी रविवारी राजधानी काबूलमधून चार कार आणि रोख रकमेने भरलेल्या हेलिकॉप्टरसह देश सोडला. रशियन दूतावासाच्या प्रवक्त्या निकिता इश्चेन्को यांच्या माहितीनुसार, “चार कार पैशांनी भरलेल्या होत्या, त्यांनी पैशाचा दुसरा भाग हेलिकॉप्टरमध्ये भरण्याचा प्रयत्न केला, पण सर्व बसवता आले नाही आणि काही पैसे रस्त्यावर पडले होते.”
तालिबान समर्थकांनी अफगाणिस्तान काबीज केले आहे, त्यानंतर अफगाणिस्तानच्या भविष्यात अस्थिरतेची चिन्हे दिसत आहेत. अशरफ घनी सध्या अज्ञातवासात आहेत. ताजिकिस्तानमध्ये उतरण्यास परवानगी नाकारल्यानंतर घनी यांना घेऊन जाणारे विमान ओमानमध्ये असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. अहवालांनी असेही म्हटले आहे की घनी अमेरिकेत जात आहेत.
अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी फेसबुकच्या एका प्रदीर्घ पोस्टमध्ये, घनी यांनी रविवारी सांगितले की ते रक्तपात टाळण्यासाठी आपण हे करीत आहोत. तालिबानने रविवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला. काबूलमधील फोटोंमध्ये राष्ट्रपती भवनात तालिबान नेते स्पॉट झाले आहेत, जिथे कधी काळी गाझी सरकारचे दैनंदिन कामकाज चालत असे.
हे ही वाचा:
राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे
अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांची लवकरच होणार सुटका
अफगाणिस्तान प्रश्नावर काय म्हणाले जो बायडन? वाचा सविस्तर
भागीदारी तुमची, पाप तुमचं आणि बोंब मोदी सरकारच्या नावाने!
देशाच्या पाश्चिमात्य प्रशिक्षित सुरक्षा दलांनी आक्रमक तालिबान समर्थकांपुढे गुडघे टेकले. या महिन्याच्या अखेरीस अमेरिकन सैन्य पूर्णपणे माघार घेण्यापूर्वी या तालिबान समर्थकांनी संपूर्ण देशावर वर्चस्व गाजवले आहे. राजधानीत तणाव आहे, बहुतेक लोक आपल्या घरात लपले आहेत आणि तालिबानी समर्थक मोठ्या चौकात तैनात आहेत. तुरळक लूट आणि सशस्त्र लोकांकडून नागरिकांचे दरवाजे ठोठावल्याच्याही बातम्या आहेत. भयावह शांतता पसरली असून रस्त्यांवर कमी रहदारी दिसत आहे. तालिबानी समर्थक शहराच्या एका मुख्य चौकात वाहनांचा शोध घेताना दिसले.