हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर जर्मन-इस्रायली टॅटू कलाकार शानी लूक हिचे किबुत्झ रिम येथे सुरू असलेल्या नोवा संगीत महोत्सवातून अपहरण करण्यात आले होते. आता तिचा शिरच्छेद करण्यात आल्याची माहिती इस्रायलचे राष्ट्रपती यित्झेचॅक हेरझोग यांनी सोमवारी दिली. तिचा शिरच्छेद केल्यानंतर तिच्या मृतदेहाची गाझामधील रस्त्यांवरून धिंड काढण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.
‘आम्हाला हे सांगण्यास अतिशय खेद होत आहे की, आम्हाला शानी निकोल लुक हिची हत्या झाल्याचे वृत्त मिळाले आहे. तिचा मृतदेह आढळला आहे. त्या क्रूर, नराधम प्राण्यांनी तिचा शिरच्छेद केला,’ अशी माहिती इस्रायलच्या राष्ट्रपतींनी दिली.
‘गाझा-इस्रायल सीमा ही शिरकाणापेक्षाही भयंकर ठिकाण झाले आहे. येथे आम्ही कत्तलखाना पाहिला. आम्ही रस्त्यावर रक्ताचे पाट वाहताना पाहिले. आम्ही आतापर्यंतची भयावह कल्पनातीत घटना पाहिली,’ अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली. अनेक व्यक्तींना अतिशय अमानुष मारहाण करण्यात आली असून अनेकांना जाळण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
केरळ स्फोट; आरोपीला दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अटक
अफगाणिस्तानने आता वर्ल्डकपविजेत्या श्रीलंकेलाही नमवले
ललित पाटील प्रकरणात ससूनमधील कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ‘वैभव’ ईडीच्या निशाण्यावर
टॅटू कलाकाराच्या कुटुंबानेही आदल्याच दिवशी तिचा मृत्यूच्या वृत्ताला दुजारो दिला होता. लुक हिचे नोव्हा संगीत सोहळ्यातून हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. एका व्हिडीओत ती ट्रकच्या मागे निश्चल पडली असल्याचे दिसत आहे. तिच्या शरीरावर अमानुष मारहाणीच्या खुणाही दिसत आहेत. तिचे कपडे फाटलेले असून हमासचे दहशतवादी तिच्यावर थुंकत असून तिला मारहाण करत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. इस्रायलचे बचाव पथक झाकाने दिलेल्या माहितीनुसार, एकट्या नोव्हा संगीत सोहळ्यात सुमारे २६० मृतदेह आढळले होते.