‘अनेक देशांसाठी भारत हा रोल मॉडेल’

जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अँनालेना बेरबॉक यांनी भारताचे कौतुक केले आहे.

‘अनेक देशांसाठी भारत हा रोल मॉडेल’

जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावत आहे. भारताला नुकतंच जी २० चं पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये अध्यक्षपद मिळाले आहे. रशिया युक्रेनला युद्ध करण्यापेक्षा शांततेचा संदेश भारताने दिला. यादरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अँनालेना बेरबॉक भारत भेटीवर आल्या आहेत. त्यांनी त्यावेळी भारतचे कौतुक केले आहे.

बेरबॉक या दोन दिवसांच्या भारत भेटीवर आल्या आहेत. भारतात त्या अक्षय ऊर्जेच्या विविध प्रकल्पांना भेटी देणार आहेत. याचा ग्रामीण भागावर कसा परिणाम झाला आहे याची माहिती देखील यावेळी त्या घेणार आहेत. याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या, गांधी स्मृतीला भेट देत आजपासून माझा भारत दौरा सुरु होत आहे. भारताच्या उच्च ऐतिहासिक महापुरुषांनी मला नेहमीच प्रभावित केलं आहे. आज मी गांधीजींबद्दल जाणून घेतल्यानतंर भारताला स्वातंत्र मिळवणं खरचं इतक सोप्प नव्हतं हे कळले आहे.

महात्मा गांधीच्या हत्येला आज ७५ वर्षे पूर्ण झाली. पण भारताच्या लोकशाही आणि आमच्या लोकशाहीचे खूपच जवळच बंध आहेत. मुल्यांची जोपासणा, मानव हक्क, स्वातंत्र, लोकशाही आणि कायद्यावरचा विश्वास या गोष्टींवर हे बंध आधारित आहेत, असंही बेरबॉक यांनी म्हटलं आहे. तसेच जगातील अनेक देशांसाठी भारत हा रोल मॉडेल आहे. त्याचबरोबर अनेक देशांमध्ये भारत सेतू म्हणूनही भारत करत आहे, अशा शब्दांत त्यांनी भारताचं कौतुक केले आहे.

हे ही वाचा:

कुर्ल्यातील बलात्काराच्या घटनेबद्दल चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप

अमेरिकेतही गुजरात निवडणुकीची रणधुमाळी, कार रॅलीतून भारतीयांचे समर्थन

दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींच्या यात्रेला म्हटलं ‘बारात’

लंडनमध्ये त्यांना वडापाव पावला!

दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी नवी दिल्लीमध्ये बेरबॉक यांच्यासोबत स्थलांतर आणि गतिशीलता यासंबंधी सर्वसमावेशक भागीदारी करारांवर स्वाक्षरी केली. दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर विशेषत: ऊर्जा, व्यापार आणि हवामान बदल या क्षेत्रांमध्ये व्यापक चर्चा केली आहे. यासोबतच दोन्ही मंत्र्यांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनशी संबंधित विषयांवरही चर्चा केली आहे.

Exit mobile version