देशाच्या सुरक्षेसाठी शस्त्रास्त्रही स्वदेशी हवीत

देशाच्या सुरक्षेसाठी शस्त्रास्त्रही स्वदेशी हवीत

भारताच्या वाढत्या प्रतिमेसोबतच, भारताला सुरक्षेसंबंधी अधिक मोठी आव्हाने पेलावी लागणार आहेत. त्यासाठी भारताने सुरक्षेसाठी देशांतर्गत संशोधन आणि उत्पादनाला सुरूवात केली पाहिजे. त्यामुळे देशाला मोक्याच्या स्थानांवरील आपले वर्चस्व अबाधित राखता येईल, कारण शस्त्रास्त्रांठी आयातीवर अवलंबून असणे, कठीण काळात आपली बाजू असुरक्षित करणारे ठरते. असे भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे

सैन्य-उद्योग भागिदारी  बद्दल एका सेमिनारमध्ये बोलताना जनरल मनोज नरवणे यांनी दुहेरी आव्हानांचा उल्लेख केला. एक म्हणजे कोविड-१९ महामारी आणि उत्तर सीमेवर भारतीय सैन्य २०२० पासून सामना करत असलेलं अघोषित युद्ध. जनरल नरवणे यांच्या मते सरकारची आत्मनिर्भर भारत ही योजना भारताच्या सुरक्षा उद्योगाला अधिकाधीक पाठबळ देईल. भविष्यातील आव्हानांविषयी बोलताना ते म्हणाले की छुपे युद्ध, माओवाद इत्यादी कारणांत सैन्य गुंतून राहिले आहे. 

“गेल्या काही काळात आशियात विशेषतः दक्षिण आशियात भारताची प्रतिमा अधिकाधीक उंचावत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या सुरक्षेशी निगडीत अधिकाधीक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.” असे त्यांनी सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (एसआयडीएम) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका सेमिनारमध्ये बोलताना सांगितले. 

भारताच्या उत्तर सीमेवर लडाख क्षेत्रात मागील काही महिन्यांपासून भारतीय आणि चीनी सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. सैन्य प्रमुखांच्या मते, भारत सुरूवातीच्या काळात प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत कमी पडत होता. त्यामुळे भारताची सुरक्षा मजबूत करण्यासाठी जनरल मनोज नरवणे यांनी भारतीय उत्पादकांना संशोधन करण्याचे आवाहन केले आहे. 

याप्रसंगी बोलताना, खासगी उद्योगांचे देशाच्या सुरक्षेसाठीचे आवश्यक योगदान, त्यांना सैन्यदल देत असलेला पाठिंबा, त्याबरोबच स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांची आवश्यकता इत्यादी बाबींवर देखील भाष्य केले आहे.

Exit mobile version