आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) पहिल्या माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि विद्यमान उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. तर हा विक्रम भारताची जगभरात मान उंचावणारा आहे. ‘आयएमएफ’च्या भिंतीवर लावलेल्या अर्थशास्त्रज्ञांच्या छायाचित्रांच्या रांगेत गीता गोपीनाथ यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. त्यासोबतच एका विक्रमाला त्यांनी गवसणी घातली आहे.
‘आयएमएफ’च्या भिंतीवर लावलेल्या अर्थशास्त्रज्ञांच्या छायाचित्रांच्या रांगेत छायाचित्र असण्याचा बहुमान मिळालेल्या त्या पहिला महिला अर्थशास्त्रज्ञ आणि दुसऱ्या भारतीय ठरल्या आहेत. याआधी हा मान माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना मिळाला आहे. रघुराम राजन हे २००३ ते २००६ दरम्यान मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि ‘आयएमएफ’चे संशोधन संचालक होते.
गीता गोपीनाथ यांनी ‘आयएमएफ’च्या भिंतीवर झळकलेले छायाचित्र शेअर करत ट्विटवर ही माहिती दिली आहे. ‘ब्रेकिंग द ट्रेंड’ असही त्या म्हणाल्या आहेत. ‘आयएमएफ’च्या कार्यालयातील भिंतीवर माजी अर्थशास्त्रज्ञांची छायाचित्र आहेत, त्या आतापर्यंत केवळ पुरुषांचीच छायाचित्रे होती. मात्र, गीता गोपीनाथ यांनी ही परंपरा खंडित केली आहे.
Breaking the trend 👊💥…I joined the wall of former Chief Economists of the IMF 😀 pic.twitter.com/kPay44tIfK
— Gita Gopinath (@GitaGopinath) July 6, 2022
हे ही वाचा:
शिंदे- फडणवीस सरकारकडून मराठा समाजासाठी ३० कोटींचा जीआर
अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; १५ जणांचा मृत्यू
काळ बदलतोय! रणजीत सावरकरांना विधान परिषद सदस्यत्व मिळणार?
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट
गीता गोपीनाथ यांची ऑक्टोबर २०१८ मध्ये ‘आयएमएफ’ मध्ये मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘आयएफएम’ चे पहिल्या उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. गीता गोपीनाथ यांनी वॉशिंग्टनस्थित जागतिक कर्जदाराच्या पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून तीन वर्षे काम केले आहे. ‘आयएमएफ’ च्या प्रमुख पदी नियुक्ती होण्यापूर्वी गीता गोपीनाथ यांचे अनेक संशोधनपर लिखाण अनेक अर्थशास्त्र जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहे.