नेदरलँड्सचे खासदार विल्डर्स आखाती देशांवर बरसले; ते टीकेच्याच लायक आहेत…

नेदरलँड्सचे खासदार विल्डर्स आखाती देशांवर बरसले; ते टीकेच्याच लायक आहेत…

भाजपाने नुपूर शर्मा यांना प्रवक्तेपदावरून काढून टाकले असले तरी त्यांना समर्थन करणारा एक वर्ग आहे. त्यात आता नेदरलँड्सच्या एका खासदाराचा समावेश झाला आहे. गीर्ट विल्डर्स यांनी ट्विट करत नुपूर शर्मा यांना समर्थन दिले आहे. शिवाय, या संदर्भात जे अरबी देश भारताविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत, त्यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

विल्डर्स यांनी म्हटले आहे की, अरब आणि इस्लामिक देश हे नुपूर शर्मा यांच्या विधानाने संतापले आहेत. पण हे अत्यंत मूर्खपणाचे आहे. कारण नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जे म्हटले आहे ते वास्तव आहे. आएशा ६ वर्षांची असताना पैगंबर यांनी तिच्याशी विवाह केला. त्यामुळे भारताने त्याबद्दल माफी मागण्याचे काय कारण? त्यांनी असेही म्हटले आहे की, या ढोंगी लोकांचे अजिबात ऐकू नका. इस्लामिक देशांत कोणतीही लोकशाही नाही, कोणतेही नियम नाहीत, कोणतेही स्वातंत्र्य नाही. ते अल्पसंख्यांकांवर अत्याचार करतात आणि मानव अधिकारांचा कधीही आदर करत नाहीत. त्यांच्यावर टीका व्हायलाच हवी. मोहम्मद पैगंबर यांची विचारसरणी ही आक्रमक आहे. आदर्शवत नाही.

हे ही वाचा:

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जमीन केंद्राचीच!

आता रेल्वेत महिन्याला होणार २४ तिकिटांचे बुकिंग

पंतप्रधान मोदींनी केली नवीन नाणी लाँच

आत्मनिर्भर भारतासाठी ७६,३९० कोटींच्या संरक्षणविषयक सामग्रीच्या खरेदी प्रस्तावांना मान्यता

 

नेदरलँड्सच्या विल्डर्स यांच्या या विधानाचीही चर्चा सुरू झाली आहे.

नुपूर शर्मा यांनी एका वाहिनीवर झालेल्या चर्चेदरम्यान मोहम्मद पैंगबर यांच्याबाबत विधान केले होते, त्यावरून त्यांच्यावर टीका झाली तसेच त्यातूनच कानपूर येथे दंगली उसळल्या. तेव्हा भाजपाने नुपूर शर्मा यांची हकालपट्टी केली. सहा वर्षांसाठी त्यांना प्रवक्तेपदावरून दूर करण्यात आले. त्यांच्या म्हणण्याचे समर्थन करणाऱ्या नविन जिंदाल यांनाही दूर केले गेले.

Exit mobile version