गाझा पट्टीत दफनभूमीची जागा संपली; आईस्क्रीमच्या ट्रकमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ

रुग्णालयांमधील इंधनाचा साठा २४ तासांत संपणार

गाझा पट्टीत दफनभूमीची जागा संपली; आईस्क्रीमच्या ट्रकमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ

हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलकडून गाझा पट्टीत सातत्याने बॉम्ब हल्ले सुरू आहेत. यामुळे दहशतवाद्यांबरोबर गाझा पट्टीत अनेक निष्पाप नागरिक मारले जात आहेत. इस्रायलकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यात हजारोने नागरिक आपला जीव गमावत आहेत. दरम्यान, एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

गाझा पट्टीत मृतदेह दफन करण्यासाठी दफनभूमीची जागा अपुरी पडत असल्याची माहिती समोर आली आहे. जागा नसल्यामुळे इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारल्या जाणाऱ्या पॅलेस्टिनींना ठेवण्यासाठी आईस्क्रीमच्या फ्रीझर ट्रकचा वापर करण्यात येत आहे. हे मृतदेह हॉस्पिटलध्ये ठेवणं धोकादायक आहे तसेच दफनभूमीतही जागा राहिली नाही. हमासच्या नियंत्रणाखाली गाझा पट्टीतील आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

“गाझापट्टीत जी हॉस्पिटल आहेत, त्यांच्या शवागारात फक्त १० मृतदेह ठेवता येऊ शकतात. त्यामुळे आईस्क्रीम फॅक्टरीतून आम्ही आईसस्क्रीम फ्रिझर आणले आहेत,” अशी माहिती शुहादा अल-अक्सा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉ. यासेर अली यांनी दिली आहे.

पूर्वी सुपरमार्केटमध्ये या ट्रकमधून आईस्क्रीम पोहोचवली जायची. आता इस्रायल- हमास युद्धात ठार झालेल्या मृतदेहांची ने-आण या ट्रकमधून केली जात आहे. इस्रायलच्या एअर स्ट्राइकमध्ये आतापर्यंत गाझा पट्टीत २ हजार ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लहान मुलांनी आपले प्राण गमावलेत. १० हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

रुग्णालयांमधील इंधनाचा साठा २४ तासांत संपणार

इस्रायलच्या सातत्याने सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे जखमी झालेल्या नागरिकांना गाझा पट्टीतील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराने गाझा पट्टीत जमिनीवरून आक्रमण करून रसद तोडल्यास रुग्णालयातील वीज, इंधन, वैद्यकीय साहित्य, मूलभूत गरजांचा पुरवठा ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वीज आणि वैद्यकीय साहित्याअभावी रुग्णालयातील हजारो जखमी रुग्ण मृत्यूमुखी पडतील, असा इशारा गाझामधील रुग्णालयांतील डॉक्टरांनी इस्रायली सरकारला दिला आहेत.

हे ही वाचा:

युएनच्या गाझा पट्टीतील कर्मचाऱ्याचा भावनिक संदेश व्हायरल

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा नुखबा फोर्सचा सर्वोच्च कमांडर ठार!

भवानी शक्तीपीठ हे संस्कारांचे उर्जा केंद्र

गोलंदाज एल. शिवरामकृष्णनने केले राजदीपला त्रिफळाचीत!

गाझामधल्या रुग्णालयांमधील इंधनाचा साठा पुढच्या २४ तासांत संपेल. परिणामी रुग्णालयांमधील रुग्णांचे जीव जातील, अशी माहिती समोर आली आहे. वीज नसल्यामुळे येथील कामे ही सध्या इंधनावर सुरू आहेत.

Exit mobile version