लॉस एंजेलिसच्या आगीत गॅरी हॉल ज्युनियरची १० ऑलिम्पिक पदके जळून खाक!

घराचेही झाले नुकसान

लॉस एंजेलिसच्या आगीत गॅरी हॉल ज्युनियरची १० ऑलिम्पिक पदके जळून खाक!

अमेरिकेचा माजी ऑलिम्पिक जलतरणपटू गॅरी हॉल ज्युनियर याला लॉस एंजेलिसला लागलेल्या आगीचा जबरदस्त फटका बसला आहे. या विनाशकारी वणव्यात गॅरी हॉल ज्युनियर याने घर आणि सामानासह त्याची सर्व दहा ऑलिम्पिक पदके गमावली आहेत. गॅरी हॉल ज्युनियर या ५० वर्षीय ॲथलीटने सांगितले की, वेगवान आगीमुळे पॅसिफिक पॅलिसेड्समधील त्याचे भाड्याचे घर, त्याची दहा ऑलिम्पिक पदके, त्याने स्वतःच्या मुलांना पोहायला शिकवलेला जलतरण तलाव आणि त्याचे बरेचसे सामान नष्ट झाले आहेत. गॅरी हॉल ज्युनियर हा आगीच्या वेळी फक्त काही वैयक्तिक वस्तू आणि त्याच्या कुत्र्यासह बाहेर पडण्यात यशस्वी झाला.

दक्षिण कॅलिफोर्नियाला सतत उध्वस्त करत असलेल्या जंगलातील आगीमुळे अनेक रहिवाशांना आपले घर सोडून बाहेर पडावे लागले. १० वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्याने त्याची सर्व संपत्ती गमावली असून यात त्याच्या पदकांचा समावेश आहे. आग लागल्याच्या दोन दिवसांनंतर गॅरी हॉल ज्युनियर याने म्हटले आहे की, हे सर्व कोणत्याही वाईट चित्रपटापेक्षा एक हजार पट वाईट होता.

हे ही वाचा..

आप आमदार गोगींचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू

सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सातही आरोपींवर मोक्का!

केरळमध्ये दलित मुलीचे तब्बल ६४ जणांनी केले शोषण

हे होणारच होतं…ठाकरे-काँग्रेस ही खुर्चीसाठीचीचं युती होती!

गॅरी हॉल ज्युनियर याच्या ऑलिम्पिक यशामध्ये २००० (सिडनी) आणि २००४ (अथेन्स) ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सलग मिळालेल्या सुवर्णपदकांचा समावेश आहे. तीन ऑलिम्पिकमध्ये तीन रौप्य आणि दोन कांस्यांसह त्याने १९९६ (अटलांटा) गेम्समध्ये रिले स्पर्धांमध्ये तीन सुवर्णपदकांची कमाई केली. दुर्दैवाने, ही पदके आणि दोन जागतिक अजिंक्यपद पदकांसह आगीत भस्म झाली आहेत. गॅरी हॉल ज्युनियर याने सांगितले की, आग इतकी वेगवान पसरत गेली की त्या वेळात पदकांबद्दल विचार मनात आला, पण सुखरूप बाहेर काढण्यासाठी वेळ नव्हता. सर्व काही जळून गेले. या गोष्टी अशा आहेत ज्याच्याशिवाय मी जगू शकतो. शेवटी, ती वस्तू आहे. हे सर्व पुन्हा तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील, परंतु आपण काय करू शकतो, अशी निराशा त्याने व्यक्त केली. पुढे ते असेही म्हणाले की, आता एक नवीन अध्याय सुरू करण्याची वेळ आली आहे. मी भाग्यवान आहे की, गोंधळातही मी शांत राहू शकतो.

Exit mobile version