महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता इतरही अनेक राज्यांमध्ये साजरा केला जातो. त्याचबरोबर अनेक परदेशातील शहरांमध्येही त्याच जल्लोषात आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. जर्मनीत नुकताच गणेश विसर्जनाचा कार्यक्रम ढोल- ताशांच्या पथकासह धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, नेदरलँड, फ्रान्स, लक्समबर्ग, बेल्जियम आदी देशांमध्ये साजरा होणारा हा उत्सव एक आकर्षण ठरत आहे.
नुकताच जर्मनीमधील भारतीय नागरिकांनी बाप्पाला अगदी धुमधडाक्यात निरोप दिला. बर्लिनमधील हसेलहाइड मध्ये असलेल्या गणेश मंदिरात हा उत्सव आयोजित करण्यात आला होता. बर्लिन शहरात ‘मराठी मित्र बर्लिन’ या संस्थेने पुढाकार घेऊन ढोल- ताशा पथक आणि लेझीम पथकाच्या सहाय्याने बापाचे विसर्जन केले. बाप्पाचे स्वागतही ढोल आणि लेझीमच्या उत्साहात करण्यात आले होते. २०१८ पासून त्यांच्याकडे ढोल पथक असले तरी यंदाच्या वर्षी त्यांनी महिलांच्या लेझीम पथकाचा समावेश केला होता.
हे ही वाचा:
गडहिंग्लजसाखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी १०० कोटींचा घोटाळा केला
आज होणार हसन मुश्रिफांचा आणखीन एक घोटाळा उघड
जॅवलिन एक प्रेमकथा…नीरज चोप्राच्या जाहिरातीचा धमाका
पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर महिला आयएएस अधिकाऱ्याने काय केला होता आरोप?
Ganesh Chaturthi celebrations in #Berlin were much more elaborate than what I'd expected. Never thought I'd be seeing Lezim and Puneri Dhol Tasha performances on the streets of Die Hauptstadt pic.twitter.com/l0ZH1iaG60
— Nimish (@nimsaw) September 18, 2021
बाप्पाच्या मिरवणुकीचा कार्यक्रम हा नियमांचे पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला गेला. शहरातील वातावरण उत्साहवर्धक होते. लॉकडाऊन आणि निर्बंधांनंतर बऱ्याच काळाने लोक एकत्र आले आणि त्यांनी उत्सव साजरा केला, असे हैद्राबादच्या रहिवाशी सध्या जर्मनीला असलेल्या गिलियन वूडमन यांनी सांगितले. गणपतीची मिरवणूक भव्य होती. तसेच ढोल- ताशा आणि लेझीममुळे जास्त उत्साह होता. फक्त भारतीयच नाही तर इतर देशांमधील लोकही मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.