संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
अंदमानच्या तुरुंगात असताना महात्मा गांधी यांच्या सूचनेनुसार वीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे दया याचिका केल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या वीर सावरकर ‘हू कुड हॅव प्रिव्हेन्टेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राजनाथ बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतदेखील उपस्थित होते.
राजनाथ म्हणाले की, सावरकर हे महान स्वातंत्र्यसैनिक होते आणि महानायक होते. काहीजण त्यांच्या योगदानावर प्रश्न उपस्थित करतात पण विशिष्टविचारधारेने प्रभावित झालेल्या गटाला सावरकरांचे कार्य माहीत नाही किंवा ते त्यापासून अनभिज्ञ आहेत. त्यांना सावरकरांची योग्य समजही नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्याची इच्छाशक्ती प्रबळ होती. त्यामुळेच ब्रिटिशांनी त्यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पण काही लोक त्यांच्यासारख्या राष्ट्रवादी विचारांवर आक्षेप घेतात व प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.
राजनाथ यांनी सांगितले की, काही लोक सावरकरांवर नाझी, फॅसिस्ट असल्याचा आरोप करतात पण जे असे आरोप करतात ते स्वतः लेनिनवादी, मार्क्सवादी विचारसरणीने प्रभावित झालेले आहेत. सावरकर हे वास्तववादी आणि राष्ट्रवादी होते. ते निरोगी लोकशाहीची चर्चा करत असत.
हे ही वाचा:
पालिकेत मराठी अधिकाऱ्याला डावलून अमराठी अधिकाऱ्याला नियुक्ती?
मैय्या परीक्षाही बघते आणि मदतही करते…
पुणे हादरले! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या
‘मलबार’ का वाढवतोय चीनची चिंता?
राजनाथ म्हणाले की, सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, कार्याबद्दल मतभेद असतील, पण त्यांचे देशासाठीचे योगदान नाकारता येणार नाही.