भविष्यात पेट्रोल-डिझेल हद्दपार करा!

भविष्यात पेट्रोल-डिझेल हद्दपार करा!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

देशामध्ये सध्याच्या घडीला वाढती लोकसंख्या तसेच त्या अनुषंगाने वाहनांची गर्दी आता मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुख्य म्हणजे डिझेल तसेच पेट्रोलचा वापर भविष्यात हद्दपार व्हायला हवा असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान दर्पण कार्यक्रमात ते बोलत होते. वाहन उत्पादकांना डिझेल इंजिन वाहनांचे उत्पादन आणि विक्री बंद करण्यास आणि इतर तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. ग्राहकांना १०० % पेट्रोल किंवा १००% बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा पर्याय देईल.

डिझेलमुळे होणारे प्रदूषण पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. ते म्हणाले, उद्योगाने पर्यायी इंधन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि पर्यायी इंधनासाठी संशोधन आणि विकासावर आता अधिक लक्ष द्यायला हवे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, उद्योगाने E20 ला अनुकूल वाहने जलद विकसित करण्याची अपेक्षा आहे. E20 वाहने म्हणजे इंधनात २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोल यांचे मिश्रण.

गडकरी म्हणाले की, ‘इथेनॉल, मिथेनॉल, बायो डिझेल, बायो सीएनजी, वीज, ग्रीन हायड्रोजन या इंधनांची निर्मिती देशात मोठय़ा प्रमाणात आता व्हायलाच हवी. तसेच सार्वजनिक वाहने विजेवर तर इतर वाहने ग्रीन हायड्रोजनच्या वापराने चालतील यासाठी सध्याच्या घडीला केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. इंधने बदलली तर प्रदूषण कमी होईल आणि प्रदूषणमुक्त भारत हाच ध्यास असायला हवा. वेस्ट टू वेल्थ यावर वैज्ञानिकांनी आता काम करायला हवे. मुंबईतील रस्ते बांधणी या विषयावर गडकरी म्हणाले, की भौगोलिक परिस्थिती पाहून मुंबईत रस्तेबांधणी गरजेची आहे. भौगोलिक परिस्थिती, पाऊस लक्षात घेता काँक्रीटचे रस्ते बांधणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:

काश्मीरमध्ये श्रीकृष्णजन्माष्टमीचा उत्साह; महाराष्ट्रात मात्र मंदिरे बंद

फेरीवाल्याने सुऱ्याने कापली पालिका सहाय्यक आयुक्तांची तीन बोटे

‘खेळाडूंची कामगिरी पाहून मेजर ध्यानचंद आनंदात असतील’

महिलांनो शिक्षण घ्या, पण पुरुषांसोबत नाही!

मराठी विज्ञान परिषदेने रविवारी आयोजित केलेल्या ‘विज्ञान दर्पण’ या ऑनलाइन कार्यक्रमात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना परिषदेतर्फे सन्माननीय सदस्यत्व दिले गेले. यामध्ये डॉ. प्रेमानंद रामाणी, डॉ. दिलीप भवाळकर, डॉ. अनिल मोहरीर, डॉ. विजय भटकर आणि प्रा. हेमचंद्र प्रधान या मान्यवरांचा समावेश होता.

Exit mobile version