फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या श्रीमुखात लगावण्यात आली आहे. मंगळवारी घडलेल्या या घटनेत एका फ्रेंच नागरिकाने मॅक्राॅन यांच्यावर हल्ला केला. तर त्यानंतर मॅक्राॅन यांच्याविरोधात घोषणा ही दिल्या आहेत.
मंगळवारी दक्षिण फ्रान्समध्ये ही घटना घडली. राष्ट्राध्यक्ष मॅक्राॅन हे एका महाविद्यालयात कार्यक्रमासाठी गेले असताना तिथे त्यांना पाहण्यासाठी फ्रेंच नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांची गर्दी बघून मॅक्राॅन हे त्यांच्याशी हस्तांदोलन करायला गेले. नागरिक आणि मॅक्राॅन यांच्यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव बॅरिकेड रसण्यात आले होते. तरिही त्यावेळी उपस्थित खाकी टी शर्ट घातलेल्या एका नागरिकाने मॅक्रोन यांचा हात धरला आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी मॅक्राॅन यांच्या डाव्या कानशिलात लगावली.
मॅक्राॅन यांच्यावर अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. पण राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षारक्षकांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणली. मॅक्राॅन यांच्या दोन सुरक्षारक्षकांनी त्या हल्लेखोराच्या आवळल्या तर बाकीच्या सुरक्षारक्षकांनी राष्ट्राध्यक्षांना तिथून हटवून त्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेतली.
हे ही वाचा:
मुंबईत गुन्हेगारीचा आलेख वाढला
छे ! छे !! उद्धव ठाकरे अजिबात वाकले नाहीत…
कोव्हिशिल्डची किंमत ७८०, तर कोव्हॅक्सिन १४१० ला
दरम्यान या हल्ल्यावर व्यक्त होत असताना ‘मला माझ्या सुरक्षेची चिंता नसून हे असे हल्ले मला काम करण्यापासून रोखू शकत नाहीत.’ असे फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे. हीच गोष्ट त्यांनी आपल्या कृतीतूनही दाखवून दिली. करण हल्ला झाल्यानंतरही त्यांनी न डगमगता पुन्हा एकदा नागरिकांशी हस्तांदोलन करण्यास सुरुवात केली.