खळबळजनक अहवालामुळे आले सत्य समोर
१९५०पासून तब्बल २ लाख मुलांचे लैंगिक शोषण फ्रान्समधील एका रोमन कॅथलिक चर्चच्या पाद्र्याने केल्याचा खळबळजनक खुलासा समोर आला आहे. मंगळवारी यासंदर्भातील धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या आहेत.
हा अहवाल तयार करणाऱ्या आयोगाचे प्रमुख जीन मार्क सॉव यांनी म्हटले आहे की, या शोषणाचे बळी ठरलेल्या मुलांच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा या चर्चने या मुलांप्रती भेदभावच केला. या शोषण झालेल्या २ लाख मुलांमध्ये बहुसंख्य हे मुलगे आहेत आणि ती १० ते १३ वयोगटातील आहेत.
या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, या चर्चने एक संस्था म्हणून स्वतःचा बचाव करण्याचा इतकी वर्षे प्रयत्न केला. किंबहुना, जी शोषित मुले आहेत त्यांच्याप्रती पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि त्यांच्याबाबत भेदभाव केला. फ्रान्समध्ये ही समस्या फार मोठ्या प्रमाणावर पसरली असून आता रोमन कॅथलिक चर्चमध्ये हा प्रकार घडल्याचे दिसते आहे. पोप फ्रान्सिस यांनी या दुर्दैवी मुलांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.
फ्रान्समधील बिशपच्या परिषदेचे प्रमुख एरिक डी मॉलिन्स ब्युफोर्ट यांनी या चर्चचा निषेध केला असून हा अहवाल स्फोटक असल्याचेही म्हटले आहे.
हे ही वाचा:
न्यायालयाचा अवमान; स्थायी समिती बैठकीतून भाजपा सदस्यांना बाहेर काढले
आता बॉम्बे नाही, मुंबई आर्ट सोसायटी!
अखेर प्रियांका गांधींना केली अटक
मुंबई नाशिक प्रवास करता येणार अवघ्या दोन तासांत
२०१८मध्ये कॅथलिक बिशपनी या आयोगाची स्थापना केली आणि त्यातून अशा शोषणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही ही समस्या फ्रान्समध्ये असल्याचे दिसते आहे. साल २००० पर्यंत अशा शोषितांप्रती भेदभाव केला गेला पण २०१५-१६मध्ये थोडी परिस्थिती बदलली. सॉव यांनी म्हटले आहे की, समाजात विश्वास निर्माण करण्यासाठी चर्चने स्वतःमध्ये सुधारणा घडविण्याची इच्छा आहे.