भारत सध्या कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. अशा वेळेला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांनी फ्रान्स भारताच्या पाठी ठामपणे उभा असल्याचे सांगितले. फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनिन यांनी मॅक्रोन यांचा संदेश ट्वीट करून ही माहिती दिली होती.
या संदेशात फ्रान्स भारताच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे सांगितले आहे.
कोविड-१९ च्या प्रकोपाचा सामना करत असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना एकतेचा संदेश देऊ इच्छितो. ज्या लढाईत कोणावरही दया होत नाही, अशा या महामारीविरुद्धच्या लढ्यात फ्रान्स तुमच्या पाठीशी आहे. आम्ही सहाय्य करण्यासाठी तयार आहोत.
हे ही वाचा:
विरारचे जळीत कांड ही नॅशनल न्यूज नाही, आरोग्यमंत्र्यांचे निबर विधान
देशवासीयांचे ‘प्राण’ वाचवायला भारतीय हवाईदल झेपावले
‘राजेश टोपे यांचे वक्तव्य असंवेदनशील’
दिल्लीतही ऑक्सिजनअभावी २५ जण दगावले
❝I want to send a message of solidarity to the Indian people, facing a resurgence of COVID-19 cases. France is with you in this struggle, which spares no-one. We stand ready to provide our support.❞
— President Emmanuel Macron
— Emmanuel Lenain (@FranceinIndia) April 23, 2021
गेल्या काही दिवसात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. भारतात गेल्या २४ तासात ३,३२,७३० नवे रुग्ण आढळून आले, जी जगातील विक्रमी रूग्णवाढ आहे. सलग दुसऱ्या दिवशी ३ लाखापेक्षा अधिक रुग्णवाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भारतातील एकूण रुग्णसंख्या १,६२,६३,६९५ एवढी झाली आहे.
त्याबरोबरच भारताने लसीकरणाचा वेग वाढवायला देखील सुरूवात केली आहे. भारतात पूर्वी केवळ कोविशिल्ड आमि कोवॅक्सिन या दोनच लसींच्या आधारे लसीकरण केले जात होते. आत्तापर्यंत लसीकरणाची वयोमर्यादा ४५ होती. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना सरसकट लस दिली जाणार आहे.