जगभरात दहशतवाद पसरवणाऱ्या कट्टर इस्लामिक संघटना आयसीसला फ्रान्सच्या सैन्याने मोठा झटका दिला आहे. सहारा वाळवंटातील संस्थापक अदनान अबु वालिद अल सहरावी याचा फ्रान्सच्या सैन्याने खात्मा केला आहे. खुद्द फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रो यांनी ही माहिती दिली. मात्र हे सैन्य ऑपरेशन कुठे झालं, आणि त्याला कसं मारण्यात आलं याबाबत त्यांनी गुप्तता पाळली.
Adnan Abou Walid al Sahraoui, chef du groupe terroriste État islamique au Grand Sahara a été neutralisé par les forces françaises. Il s’agit d’un nouveau succès majeur dans le combat que nous menons contre les groupes terroristes au Sahel.
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) September 15, 2021
ग्रेटर सहारा प्रांतात इस्लामिक स्टेट अनेक दहशतवादी हल्ले करत असतो. यांच्या मदतीला अलकायदासोबत जोडलेले द सपोर्ट ऑफ इस्लाम अँड मुस्लीम नावाचा गटही असतो. त्यामुळेच या दहशतवादी गटांविरोधातील युद्धात हे मोठं यश असल्याचं मॅक्रो आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. सहारवी हा पश्चिमी आफ्रिकेच्या सहेल भागातील इस्लामिक स्टेटचा मोठा नेता होता. त्याच्या संघटनेने २०१७ मध्ये अमेरिकी सैन्यावर हल्ला केला होता. तर ऑगस्ट २०२० मध्ये याच सहारवी हे फ्रान्सच्या ६ चॅरिटी वर्कर्सच्या हत्येचे आदेश दिले होते. या हत्याकांडात फ्रान्सच्या चॅरिटी वर्कर्ससोबत नायजेरियाच्या लोकांनाही मारण्यात आलं होतं.
साहेल प्रांतात फ्रान्स आपल्या सैन्याला नवं रुप देण्याच्या तयारी असल्याचं मॅक्रो म्हणाले होते. साहेल प्रांतात फ्रान्सच्या सैन्याने इस्लामिक स्टेटविरोधात मोर्चा उघडला आहे. मात्र, आता तिथं सैन्य कमी करणार असल्याचा प्लान आहे. मॅक्रोन म्हणाले की, फ्रान्सची एंटी जिहाद बरखेन फोर्स आता स्थानिक सैनिकांना प्रशिक्षण देणार आहे आणि त्यांना इस्लामिक स्टेटविरोधात उभं करणार आहे.
हे ही वाचा:
अभिनेत्याच्या जाचाला कंटाळून शरीरसौष्ठवपटू मनोज पाटीलची आत्महत्या
पंतप्रधान मोदी म्हणतात, उत्तर प्रदेशातील गुंडगिरीचा योगींनी अंत केला!
तब्बल १४ वर्षांनंतर त्याच्या शिक्षेत केली वाढ! काय घडले वाचा…
जान मोहम्मद हे केवळ प्यादे; मुख्य सूत्रधार मुंबईत
मॅक्रोन यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, “फ्रान्स आज त्या सर्व हिरोजची आठवण काढतो, जे साहेल प्रांतातील बरखेन ऑपरेशनमध्ये शहीद झाले. मी त्यांच्या कुटुंबाविषयी आणि त्यांच्यावर झालेल्या आघातावर विचार करतो आहे. त्यांचं बलिदान बेकार जाणार नाही. आम्ही आमचे आफ्रिकी, युरोपियन आणि अमेरिकन मित्रांसोबत मिळून युद्ध सुरुच ठेऊ.”